ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोडूसर कं. लि. यवतमाळचे अन्जी येथील दाल मिलचे उद्घाटन सोहळा संपन्न
घाटंजी तालुका प्रतिनिधी-
घाटंजी-शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या सहाय्याने व सेंटर फॉर कलेक्टर डेव्हलपमेंट या सेवाभावी संस्थेच्या मार्गदर्शनात केळापूर, घाटंजी, झरी या तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांकरिता ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड ची स्थापना करण्यात आली व ही कंपनी तीन तालुक्यातील 132 गावांमध्ये शेतकरी गट तयार करून 3602 शेतकऱ्यांसोबत कार्यरत असून त्याच माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतःच्या उत्पादनावर प्रक्रिया करावी हा उद्देश ठेवून तीन तालुक्यांमध्ये दालमिल युनिटची उभारणी करण्यात आली त्याच निमित्ताने दिनांक 15/01/ 2024 रोजी अंजी येथील दाल मिलचे उद्घाटन केळापूर- आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार. मा. डॉक्टर संदीप भाऊ धूर्वे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.संदीप धुर्वे यांनी सांगितले की आदिवासी विभागामार्फत खूप काही योजना आहे आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा. याशणी नागराजन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी केळापूर, आत्माराम धाबे प्रकल्प अधिकारी पुसद, शबरीचे जिल्हा समन्वयक अडवतकर सर , साळवे साहेब तहसीलदार घाटंजी अंंजी येथील सरपंच गोपाल डंभारे ,प्रकल्प कार्यालय चे कर्मचारी प्रशांत सोरते सर ,वरील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सी.सी.डी.चे प्रकल्प अधिकारी विठ्ठल राव सर यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कापसावर प्रक्रिया करण्यासाठी कापूस जिनिंगची उभारणी लवकरच करण्यात येईल असे मार्गदर्शना दरम्यान सांगितले यावेळी ग्रामीण आदिवासी फार्म प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष माणिक मेश्राम, उपाध्यक्ष अरविंद सिडाम सचिव श्री प्रल्हाद आत्राम ,सदस्य बंडूभाऊ तोडसाम, अरविंद पेदोंर नंदू तुमराम बंडू आडे ,व अंजी येथील महिला सदश्या, उमेदच्या महिला सदश्या व ग्रामीण आदिवासी फार्मर प्रोडूसर कंपनीचे सर्व सदस्य शेतकरी बांधव या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सी.सी.डी.चे प्रकल्प अधिकारी विठ्ठलराव सर,शेख इमरान श्री. सुनील चौधरी, साई चुक्कलवार ,संजय वडसकर, स्वराज भगत ,उमेश नैताम , योगेश कुडुमते, भानु तुजेवार ,सुजाता कुडमते, प्रमोद दुधकोहले ,प्रफुल सोयाम ,विवेक देवलवार ,स्वप्नील मेश्राम, सुरज मेश्राम, रितेश गोरे ,आदींनी परिश्रम घेतले.