हटके

हनुमान आणि पूजाला दिसला कंस मामा आणि ……

Spread the love

पालनपूर / प्रतिनिधी

                      जालोन इथं राहणारा  हनुमान आणि पूजा हे शेजारी. त्यामुळे त्यांच्यात प्रेम निर्माण झाले. दोघांना लग्न करायचे होते पण पूजाच्या घरच्यांचा याला विरोध होता. हनुमान अलाहाबाद मध्ये काम करायचा. त्यांनी लग्न करून कुठेतरी दूर जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केले .आणि ते अहमदाबाद ला जायला निघाले होते.

                 भविष्याची स्वप्न रंगवत ते अहमदाबादला जाण्यासाठी निघाले. अबुरोड-पालनपूर फोरलेन रस्त्या वरून बस आपल्या गंतव्य स्थानाकडे निघाली होती.   ते ज्या बस मधून प्रवास करत होते त्याच बस मध्ये पूजा चा मामा बसला होता. त्याने या दोघांना पाहून घेतले होते. आता हा घरच्यांना सांगेल या धास्तीने त्या दोघांनी धावत्या बस मधून उड्या टाकल्या.

त्या दोघांनीही मामाला पाहिलं व दोघं मनातून घाबरले. त्यांनी बसच्या खिडकीतून उडी मारली. त्यांनी उडी मारताना बस खूप वेगात होती त्यामुळे दोघांनाही खूप लागलं. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तरुणीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तरुण अजूनही गंभीररित्या जखमी आहे. अहमदाबादला जाऊन संसार सुरू करण्याच्या आधीच त्यांचा संसार मोडला. तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणावर तिच्या हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तरुणावर कारवाई करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. बसचा वेग खूप जास्त असल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close