श्री महारुद्र मारोती मंदिर जिनोद्वार व कलश स्थापना थाटामाटात संपन्न
चांदुर् रेल्वे / अमोल ठाकरे
चांदुर शहरा मध्ये महारुद्र नगर भोले लेआउट इथे मारोती मंदिरा मध्ये जिनोद्वार व कलश चे स्थापना करण्यात आली.. त्यामुळे शहारा मध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमांची सुरवात वास्तुपूजन आणि होमी अभिषेक करून करण्यात आली. दुपारी दिंडी काढण्यात आली या वेळी हजारो लोकसंख्या या दिंडी मध्ये सहभागी झाले.. दिंडी मध्ये भजन मंडळी यांच्या भंजना मुळे पूर्ण चांदुर नगरी दुमदूमली…सायंकाळी राधे राधे सुंदरकांड श्री पांडेयजी व श्री आशिष जी जालान भजन गायक यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी सकाळी अभिषेक मूर्ती कलश प्राण प्रतिष्ठा व कलश रोहन करण्यात आले… या वेळी ह. भ. प. श्री भागवतचार्य गौरक्षण मेटे शात्री महाराज..केज जिल्हा बीड यांच्या हस्ते कीर्तन करण्यात आले. आणि भव्य असा महाप्रसाद चा आस्वाद हजारो लोकसंख्येने घेतला…..भोले परिवारी सर्वांचे आभार मानले.