आर्वीत संतप्त शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात पेटवला कापूस
कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी
आर्वी , प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी :- भाजपा प्रणित सरकारने व पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट तर सोडून द्या त्याचा लागत खर्च सुद्धा निघेनासा झाला आहे. चार वर्षाआधी कापसाचा काय भाव होता तोच भाव आता त्यापेक्षाही कमी त्यातुलनेत रासायनिक खते, कीटकनाशके यांचे भाव गगनाला भिडले आहे. सोयाबीन 7000 रुपये क्विंटल होते ते आहे 4 हजार 4500 रुपये आहे. तर मग कोणत्या न्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. केंद्र सरकारला राज्याने जे हमी भाव पाठवले ते सुद्धा केंद्र सरकार देऊ शकले नाही. मात्र तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले ही शेखी कशी काय मिरवली जाऊ शकते ? हेच समजत नाही. त्यामुळे आज आर्वी येथे शेतकऱ्यांनी शेतकरी नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात कापूस पेटवून प्रतीकात्मक आंदोलन केले. शेतकऱ्याची सरकारला मागणी आहे की कापसाला प्रती क्विंटल १०,००० रुपये हमी भाव देण्यात यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना ते पिकवल्या नंतर खिशात दोन पैसे येईल. आज जो भाव आहे त्या भावात कापूस उत्पादन असो अथवा सोयाबीन असो की अन्य शेती उत्पादने लागत खर्च सुद्धा निघेणासा होत आहे. एकीकडे निसर्ग आम्हा शेतकऱ्यांना झोडपून काढते. तर सरकार ने तर ठरवलेच आहे की शेतकरी लुटीच धोरण अस दिसते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात कापूस पेटवून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना उपविभागीय अधिकारी आर्वी याच्या मार्फत निवेदन देऊन सादर मागणी करण्यात आली .प्रहार सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष बाळा जगताप यांनी सांगितले की कापसाला प्रती क्विंटल १० हजार रुपये भाव देण्यात यावा. आज आम्ही आमचाच कापूस पेटवून प्रतीकात्मक आंदोलन करीत आहो. पुढे सुद्धा असेच शेतकरी विरोधी धोरण सरकारचे सुरू राहिले तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. असे बाळा जगताप यांनी निवेदन देताना स्पष्ट केले.