सामाजिक

रेल्वे थांब्यासाठी रेल रोको कृती समिती आक्रमक

Spread the love

चांदूर येथील रेल्वे थांब्यासाठी रेल्वे महाव्यवस्थापकांना घालणार घेराव…!

धामणगाव स्टेशनवर धडकणार चांदूरवासी

रेल रोको कृती समितीची पत्रकार परिषदेतून माहिती

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे स्थानकावर कोरोनापुर्वी असलेला जबलपूर – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस आणि लोकमान्य टर्मिनल शालीमार एक्सप्रेसचा थांबा पुर्ववत करण्यात यावा या मागणीकरिता चांदूर रेल्वे तालुकावासी १९ जानेवारीला धामणगाव रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना (जी.एम.) घेराव घालणार आहे. यासंदर्भाचा निर्णय आम्ही सर्व पक्षीय, सर्व संघटना, मंडळे व तालुकावासीयांच्या १३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीतून घेतला आहे अशी माहिती रेल रोको कृती समितीतर्फे रविवारी स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, आम आदमी पार्टीचे नेते राजाभाऊ भैसे, माजी न.प. सभापती मेहमुद हुसैन, भाकपचे नेते काँ. विनोद जोशी, माकपचे नेते काँ. रामदास कारमोरे, भाजपाचे माजी नगरसेवक बच्चू वानरे, काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रा. रवींद्र मेंढे, शिवसेना (ठाकरे गट) नेते बंडूभाऊ यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिरभाते, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता गुड्डू बजाज, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष हर्षल वाघ, स्व.डॉ. पांडूरंग ढोले मित्र परिवाराचे संजय डगवार, शहरवासी मनोज महाजन, चरण जोल्हे, महादेव शेंद्रे, अंकुश जोशी, विनोद लहाणे यांसह अनेकांची उपस्थिती होती. सोबतच रेल रोको कृती समितीला रेल्वे सल्लागार समितीचा सुध्दा पाठिंबा आहे.

जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि लोकमान्य टर्मिनल शालीमार एक्सप्रेस ह्या गाड्या कोविड – १९ महामारीनंतर दीर्घ प्रतीक्षेनंतर जुलै – २०२२ पासून कार्यान्वित करण्यात आली. मात्र रेल्वे विभागाच्या कोचिंग अधिसूचनेनुसार, चांदूर रेल्वे स्थानकावरील जबलपूर – अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस (१२१५९/१२१६०) आणि लोकमान्य टर्मिनल शालीमार एक्सप्रेसचा (१८०३०/१८०२९) थांबा कोरोनानंतर बंद करण्यात आला आहे. कोरोनापुर्वी सदर गाडीचा थांबा नियमितपणे सुरू होता. दोन्ही गाड्यांचे थांबे स्थानिक स्टेशनवरून अचानक रद्द केल्याने सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे. तसेच व्यापारी वर्गाचे सुध्दा मोठे नुकसान होत असुन शिक्षणाकरिता बाहेरगावी ये – जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रेल रोको कृती समितीतर्फे प्रत्यक्ष दिल्ली येथे जाऊन रेल्वे मंत्रालयात याविषयी शेकडो नागरिकांच्या सह्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. खासदार साहेबांना सुध्दा याबद्दल वारंवार सांगितले, मात्र अजुनही न्याय मिळालेला नाही असे रेल रोको कृती समितीने म्हटले आहे. अशातच रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक (जी.एम.) हे १९ जानेवारी रोजी दौऱ्यावर येत असून त्यांचा धामणगाव रेल्वे स्टेशनवर थांबा राहणार आहे. त्यामुळे आता चांदूर रेल्वे तालुकावासीयांना घेऊन रेल्वेचे महाव्यवस्थापकांना घेराव घालण्याचे नियोजन असुन त्यांच्यासमोर या समस्या मांडायचे असल्याचे सांगितले. ही मागणी संपुर्ण तालुकावासीयांचीच असल्यामुळे जास्तीत जास्त चांदूर रेल्वे तालुकावासी यात सहभागी होणार अशी अपेक्षा असल्याचे रेल रोको कृती समितीने पत्रकार परिषदेतून म्हटले आहे.

 

 खासदार, आमदारांनीही सहभागी व्हावे

चांदूर रेल्वे वासीयांची रेल्वे थांब्याची मागणी अनेक दिवसांची असुन याचा लढा सामान्य नागरिक रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून लढत आहे. १९ जानेवारीच्या घेराव आंदोलनात नागरिकांसवेत खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड यांनीही सहभागी होऊन रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारावा, जेणेकरून ते सुध्दा या मागणीत जनतेसोबत आहे असे तेव्हाच समजेल असे यावेळी उपस्थितांनी म्हटले.

 

 रेल्वे स्टेशनचा विकास होणे गरजेचे

चांदूर रेल्वे स्टेशनवर अपसाईड आणि डाऊन साईडला प्रत्येकी २०० मीटरचा शेड उभारण्यात यावा, इंडिकेटर कोचची व्यवस्था करण्यात यावी, दोन्ही प्लॅटफॉर्मवर स्वतंत्र मुत्रीघर तयार करण्यात यावे, स्टेशनवर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, दोन्ही प्लॅटफॉर्मवर रात्रीच्या वेळी अंधार राहत जास्तीत जास्त लाईटची व्यवस्था करण्यात यावी व शिवाजीनगर मधील सुरू असलेल्या रेल्वे पुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे अशी सुध्दा मागणी आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close