काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने!
सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेधक अनुभव
पत्रकार संवाद कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सूर
नवे बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पत्रकारांनी स्वतःमध्ये अपडेट बदल घडवणे आवश्यक
-आशीष अम्बाडे
पत्रकारितेच्या संदर्भामध्ये गेली काही वर्ष जी सातत्याने ओरड सुरू आहे ही ओरड काही नवीन नाही. २०१४ च्या नंतर फार बदल झाला असं अनेकांचे म्हनणं आहे त्यात काही तथ्य नाही.
तथ्य याच्यासाठी नाहीये की, २०१४ हे तारीख नाही की ज्यामुळे आपण पतनाकडे वळतो. ही एक सातत्याने होणारी प्रोसेस आहे. कुणी असं म्हणत असेल की, आता या दिवसापासून पत्रकारिता लयाला गेली. पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आपण स्वतःला अपडेशन ठेवलं नाही .
क्षणाक्षणाला अपडेट राहिलो नाही .पत्रकारांनी नवी आव्हाने स्वीकारण्याकरता व ती तेवढ्याच ताकतीने पेलावण्याकरता स्वतः ला अपडेट करता आलं पाहिजे किंबहुना हीआता आधुनिक डिजिटल काळाची गरज आहे . तरच पत्रकारिता लयाला जात नाही असे मी म्हणेन. फक्त ओरड माध्यमांवर टाकायची आणि मोकळ व्हायचं कसं चाललंय असे स्पष्ट मनोगत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे चंद्रपूर -गडचिरोली झी न्यूज २४मराठीचे निर्भीड व्यक्तिमत्व असलेले वरिष्ठ प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या १२जानेवारी २०२४ ला राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सावित्रीबाई फुले ,फातिमा शेख, राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जन्मदिन कार्यक्रमानिमित्त निमित्त पत्रकार -संवाद कार्यक्रमात श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम ,वडगाव चंद्रपूर येथील नियोजित कार्यक्रमात मांडले.
प्रसंगी काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने!
(सफरनामा- सामाजिक आणि पत्रकारिता वेचक आणि वेधक अनुभव) या विषयावर आयोजित पत्रकार संवाद कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामभाऊ आखरे ,भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष, संचालक (RTI )प्रशिक्षण माहिती केंद्र तथा जनमंच सदस्य नागपूर यांनी आपले अध्यक्षीय विचार मांडताना म्हणाले पत्रकारांनी नवीन आव्हाने स्वीकारत स्थानिक स्तरावरील विविध सामाजिक सर्वसामान्यांचे लोकहितकारक प्रश्नांना हात घालावा . त्याचबरोबर अनेक प्रश्न पत्रकारांचे देखील आहेत ते त्यांच्या जीवनाशी व कुटुंबाशी निगडित आहेत. त्यांची दखल केंद्र व राज्य शासनाने घ्यावी. त्यांना आवश्यक त्या सोयी सवलती उपलब्ध कराव्यात जेणेकरून त्यांच्या निर्भय कार्याला ऊर्जा मिळेल . पत्रकारांनी कुठल्याही क्षणी राजकीय मंडळीचे धारजीने बनून लेखन करू नये, आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान व डिजिटल माध्यमातन अपडेट होऊन काम करावे. असे विचार राम आखरे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर आपल्या वक्तव्यात मांडले . पत्रकार – संवादाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून पर्यावरण क्षेत्रातील ख्याती प्राप्त प्रा .सुरेश चोपणे, माजी सदस्य पर्यावरण वन व हवामान मंत्रालय ,दिल्ली, अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी, पर्यावरण संस्था चंद्रपूर यांनी आपले मौलिक विचार मांडताना अनेक वेचक व वेधक अनुभव व्यक्त करीत पत्रकारिता क्षेत्रात आपण केलेल्या कार्याचा व त्यावेळी असलेल्या परिस्थितीचा पैलू वर प्रकाश टाकीत प्रा चोपणे म्हणाले आता हल्ली साप्ताहिक आपल्याला फार पाहायला मिळत नाही .मॅक्झिन पाहायला मिळतात ही सर्व साप्ताहिक ,पाक्षिक असो सर्व आता हळूहळू कमी होत चाललेली आहेत परिणामी यावर विविध क्षेत्रात काम करणारा वर्ग हळूहळू कमी होत जाऊन संपुष्टात आल्याचे आपणास दिसत आहे . संबंधित क्षेत्रातील फार मोठा वर्ग व पत्रकार तथा उद्योग व्यवसायातील आव्हानात्मक बाबआजच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे .बदलत्या तंत्रज्ञान व आधुनिक डिजिटल मीडिया यामुळे अनेक पोर्टल रजिस्ट्रेशन फी भरून पोर्टल बातम्यांचे प्रमाण वाढले .आता घरबसल्या पाहिजे त्या बातम्या विविध स्तरावर घेऊन तात्काळ पोर्टलवर सहज सोप्या पद्धतीने घेऊन प्रसारित होऊन बघता येत आहेत .ही सगळी आधुनिक डिजिटल मीडियाची उत्क्रांती आहे .आधी पेननी लिहायचं मग त्यात काही शब्दरचना सुधारून परत पुन्हा लिहून लिफाफा बनवून बस स्टॉप वर लिफाफे पार्सलने पाठवायचे आणि संबंधित वृत्तपत्राच्या कार्यालयात पोहोचायचे त्यानंतर जी बातमी लागल्याचा आत्मिक आनंद वेगळा अनुभवाला यायचा असा तो पत्रकारितेचा काळ होता .आता काळ बदललाय आता आधुनिक डिजिटल क्रांतीने उत्क्रांती केली आहे त्यात स्वतःला पत्रकारांनी वास्तविक त्यानुसार बदलायला हवं ,आता जुन्या पत्रकारांनी स्वतःला बदलत नवीन ग्रुप केला असा मी म्हणेन. मध्यंतरीच्या काळात नव्या आव्हानांना स्वीकारत पत्रकारांनी नव्याने बदल घडवून अपडेट राहण्याची वेळ आली ती पुढील आव्हाने स्वीकारण्यासाठी . पत्रकारांनी निर्भयपणे लोकहितकारक प्रश्नांना गतीने मांडण्याची कसब बाळगली पाहिजे. असे प्रांजळ मत पत्रकार -संवाद कार्यक्रप्रसंगी व्यक्त केले . प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,निमंत्रक म्हणून रवींद्र तिराणिक यांनी उपस्थित मान्यवर वक्ते मार्गदर्शक अध्यक्ष यांचा कार्याचा संपूर्ण जीवन परिचय करून दिला .आशीष अम्बाडे झी न्यूज मराठी २४ तास चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, रवींद्र तिरानिक महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, जनमंच सदस्य नागपूर, श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम चे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे एमडी (होमो), बागला होमिओपॅथी कॉलेज खामगाव, पत्रकार संघाच्या चंद्रपूर- यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. डॉ मंजुषा सागर, जिल्हाध्यक्ष किशोर पत्तीवार श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम सचिव अरुण बावणे, सुरेश मातेकर, सुरेश पोनोती आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन हबीब शेख, परिचय व आभार प्रदर्शन शंकर तडस यांनी केले .प्रसंगी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सदर पत्रकार संवाद कार्यक्रमात अतिथी मार्गदर्शक वक्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा शाल व श्रीफळ वृक्ष रोपटे व स्वामी विवेकानंद विचार प्रेरक पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला . प्रसंगी श्रमिक पत्रकार चंद्रपूर पदाधिकारी सदस्य तथा प्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर, ग्राफिक्स डिझायनर आर्टिस्ट मिलिंद वाकडे, सी टीव्ही वाहिनीचे प्रतिनिधी हबीब शेख, शंकर तडस यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित पत्रकार व सामाजिक प्रतिनिधी जिअ. शशिकांत मोकाशी ,अशोक पारखी , विजय ठेंगणे, संजय रामटेके, पल्लवी वाघमारे, दशरथ वाघमारे , वासुदेव शेंडे, धर्मेंद्र शेरकुरे, जगदीश पेंदाम ,विनोद शर्मा, मोरेश्वर उद्योजवार, होमदेव तुम्हावार, गोविंद मित्रा, शशिकांत ठक्कर, दीक्षांत बेले, चारुल कोटकर, मनोज गाठले, सुरज गोरंतवार समीर आसुटकर आदींना सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
आशिष यांचे मनोगत- पत्रकारितेच्या संदर्भामध्ये गेली काही वर्ष जी सातत्याने ओरड सुरू आहे. ही ओरड काही नवीन नाही. सरळ संदर्भात विश्लेषण झाल्यास २०१४ च्या नंतर फार बदल झाला असं अनेकांचे म्हणणं आहे. त्यात काही तथ्य नाही. तथ्य याच्यासाठी नाहीये की, २०१४ हे तारीख नाही, की साल नाही की जेव्हापासून आपण पथनाकडे वळतो. ही एक सातत्याने होणारी प्रोसेस आहे. कुणी असं म्हणत असेल की आता या दिवसापासून पत्रकारिता लयाला गेली. पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आपण समजा अपडेशन नाही ठेवलं. अपडेट राहिलो नाही तर तशीही पत्रकारिता लयाला जात नाही. तुम्ही समजा एखाद्या कार्यालयामध्ये क खात्यामध्ये कारखून असाल लिपिक असाल आणि तुम्हाला फाईल प्रूव्ह करण्याची जी पद्धत आहे. शेरे घेणे, डेटा घेणे, ताशेरे ओढणे. आणि पुढच्या डेक्स कडे पाठवणे. हे एवढेच काम तुम्हाला माहित आहे. वर्षानुवर्ष तेच काम करत असल्यामुळे तुम्हाला पुढे त्याच्यामध्ये डिजिटालेशन येणार आहे त्यात बदल होणार आहे. हे तुम्हाला समजून घेता आलं नाही अपडेट राहता आलं नाही त्यामुळे ही चाललेली चिडचिड आहे. हे त्या मागचे सर्व कारण मीमांसा तुम्ही अपडेट होऊ शकला नाही .स्वतःला अपडेट करून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही .चोपणे सरांनी खिळे जुळवून वर्तमानपत्र जोडले . खिळे जुळवून वृत्तपत्र करण्याची पद्धत मीपण जवळून अनुभवली आणि मी आज ट्विटरही बघतो आहे. मी ट्विटर याचा उल्लेख याच्यासाठी घेतला. पूर्वी पत्रकार बातम्या द्यायचे वर्तमानपत्रात घेण्याकरता आता आजकाल ट्विटर बातम्या देतो म्हणजे अमिताभ बच्चन आज काय म्हणाले, योगी आदित्यनाथ काय म्हणाले मग इंस्टाग्राम वरचा कुठल्या एखाद्या नटीचा फोटो लोकांना जास्त आवडतो आहे का? त्यावरून सगळे आराखडे त्या त्या पद्धतीने बांधले जात आहेत .त्यावरून प्रिंट वृत्तपत्राचा ,चॅनेल चा ,वेबसाईटचा, पोर्टलचा -युट्युब चा खूप वाढवण्याचा उद्योग सुरू आहे. आता हे पहिल्यांदाच होत आहे का तसंही नाही माध्यम बदलली मात्र त्याच्यातला पॉझिटिव्हिटी न घेता निगेटिव्हिटी तशीच आहे त्याच्यामध्ये परिवर्तन काही झाले नाही तशाच आहेत. लर्निंग एक्सप्रेस जो एखाद्या पत्रकारांमध्ये आहे तो मात्र खूप मोठा चॅलेंज आहे लर्निंग एक्सप्रेस तिजी काय समस्या आहे ती सगळ्यांसाठीच आहे गेली अनेक वर्ष अध्यापटाचे काम करणारे चोपडे सर लर्निंग साठी अपडेट उदयोन्मुख होण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी एखाद्या कार्यशाळेत दर पाच वर्षांनी जावंच लागतं जर एखाद्या पत्रकारांनी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी एखाद्या प्रशिक्षण शाळेत किंवा कार्यशाळेत जावं लागत असेल तर काय वाईट आहे सगळी ओरड फक्त माध्यमांनवर करायची सगळी ओरड टीव्ही चॅनल काय दाखवताय इंस्टाग्राम ,वेबसाईट काय दाखवताय याच्यावर करायची. आणि स्वतःच्या घरी आलेला मराठी पेपर फक्त रद्दीतच याचं वाईट कोणाला वाटावं सत्य आहे ना !तुमच्या माझ्या घरी आलेला कोणताही पेपर मी अनेक जणान कडे पाहतो तो उघडून सुद्धा बघितला नाही. तुमचा टार्गेट एरिया कोणता आहे. तेलंगणा स्टेट आहे का ?तुमचा टार्गेट एरिया गुजरात स्टेट आहे का? तुमचा टार्गेट एरिया मराठी माणूस ठीक आहे. मराठी असेल… तर मराठी माणूस पण तुमच्या घरातल्या मराठी माणसाला कुटुंबातील परिवाराला मराठी वाचावसं वाटतं का ?हे मी हे दररोज सकाळी चौघडा घेऊन सांगू का ?हे कोणाचं कर्तव्य आहे त्याच्या कुटुंबाचं पण कुटुंबाला हे कळतच नाही .मग कुटुंबाला काय कळतंय हे मी गंमत म्हणून सर्वे केला मराठी कुटुंब सर्वात जास्त गुगलवर काय सर्च करतात मी म्हटलं कुटुंब ..कुटुंब म्हणजे मुलं नाहीत मुलं म्हटलं तर वेगळ्याच विषय आहे .कुटुंब काय सर्च करतात इंग्रजी वशिष्ठ ..पाच मराठी भाषेतील पुस्तकांची नावे घरातील बारा वर्षे पूर्ण केलेल्या मुलाला माहित नाही हे अपयश कोणाचं? तुमचं की माझं तुम्ही तुमच्या घरातील किंवा इंग्रजी माध्यमातील मुलांना कुठल्याही मुलाला विचारा की बाबा रे मराठी पुस्तकांची नाव काय आहेत काय लिहिले आहे त्याच्यात कुठले लेखक आहेत त्याचा मर्म काय आहे इथून मराठी वाट लागतंय आणि ओरड माध्यमांवर टाकायची कसं चाललंय असे स्पष्ट मत आशिष अंबाडे यांनी मांडले.
प्राध्यापक मंजुषा सागर मनोगत हम जिस क्षेत्र में काम कर रहे है ऊस क्षेत्र में नकली लोगो का स्तर ज्यादा बढ रहा है, अब यह ये समय आ रहा है जिसके सच्चाई को पैलू पर नजर अंदाज करते हुए करते हुए झुटी बाते फैलाई जा रही है, इस संदर्भ के उपर उपर ना बोले तो अच्छा ही है !लेकिन तो हम अपने संख्या बढे ना बडे लेकिन हम अपने पत्रकार होने के स्तर पर कभी भी सच्चाई को मिटने ना दे, यह हमारा जीवन का प्रयास होना चाहिये
प्रा .सुरेश चोपणे यांचे मनोगत
आता साप्ताहिक आपला फार पाहायला मिळत नाही मॅक्झिम पाहायला मिळतात ही सर्व साप्ताहिक असो, ञैमासिक ,पाक्षिक असो ही सर्व आता हळू हळू कमी होत चाललेली आहेत . त्यामुळे यावर विविध क्षेत्रात काम करणारा वर्ग हळू कमी होत जाऊन संपुष्टात आल्याचे आपणास दिसते हा फार मोठा व्यवसाय व आव्हानात्मक आजच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे.
बदलत्या तंत्रज्ञान व आधुनिक डिजिटल मीडिया यामुळे अनेक पोर्टल रजिस्ट्रेशन फी भरून पोर्टल बातम्यांचे प्रमाण वाढलंय आता घरबसल्या पाहिजे त्या बातम्या विविध स्तरावर घेऊन तात्काळ पोर्टलवर सहज सोप्या पद्धतीने घेऊन प्रसारित होऊन बघता येत आहेत .
ही सगळे आधुनिक डिजिटल मीडियाची उत्क्रांती आहे.
आधी पेननी लिहायचं मग करेक्शन करायचं मग सुधारून पुन्हा लिहून इन्व्हलप मध्ये टाकून बस स्टॉप वर पार्सल ने लिफाफा पाठवायचा आणि मग तो फक्त कार्यालयात पोहोचायचा आणि त्यानंतर बातमी लागल्याचा आनंद वेगळा असा तो पत्रकारितेचा काळ होता ….आता काळ बदललाय आता आधुनिक डिजिटल काळ त्यात स्वतःला काळानुरूप बदलायला हवं त्यानुसार आता जुन्या पत्रकारांनी स्वतःला बदलत नवीन ग्रुप केला असा मी म्हणेन मध्यंतरीच्या काळात नव्या आव्हानांना स्वीकारत पत्रकारांनी नव्याने बदल घडवून अपडेट राहण्याची वेळ आली ती पुढील आव्हाने स्वीकारण्यासाठी पत्रकार आणि निर्भय निर्भीड स्वच्छ प्रतिमा लोकहितकारक प्रश्नांना गतीने मांडण्याची कसब बाळगली पाहिजे असे प्रांजळ मत व्यक्त केले.
रामभाऊ आखरे पत्रकांनी नवीन आव्हाने स्वीकारत स्थानिक स्तरावर पासून विविध सामाजिक स्तरावरील सर्व सामान्यांचे लोकहिताकारक प्रश्नांना हात घालावा. पत्रकारांच्याही अनेक प्रश्न आहेत त्यांची दखल केंद्र व राज्य शासनाने घ्यावी त्यांना सोयी सवलती उपलब्ध कराव्यात जेणेकरून त्यांच्या कार्याला ऊर्जा मिळेल.
पत्रकारांनी कुठल्याही राजकीय मंडळीचे धार्जिने बनवून लेखन करू नये
आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान व डिजिटल यात अपडेट होऊन काम करावे