ना. अजित दादा पवार यांच्या हस्ते अनिल मालगे यांना नियुक्तीपत्र
अकोला – प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेशची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथील नामदार अजित दादा पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी मलबार हिल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांना नियुक्तीपत्र नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आ्कोला महानगर जिल्हाध्यक्षपदी अनिल मालगे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष
तथा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले
यावेळी कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे आखाडे प्रदेश समन्वयक ईश्वर बाळबुद्धे यांनी आपले विचार मांडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाचे कार्य छोट्या छोट्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम ओबीसी विभागाने करावे असे म्हटले यावेळी ना. अजित दादा पवार यांनी ओबीसी विभाग हा पक्षाचा महत्त्वपूर्ण घटक असून ओबीसींच्या आरक्षणाला थोडासाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवकरच तीन पक्षांचे मेळावे राज्यस्तरीय,विभाग स्तरीय ,व जिल्हा स्तरावर घेण्यात येतील असे नामदार अजित दादा पवार यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या नवनियुक्त प्रदेश कार्यकारणी तथा जिल्हाध्यक्ष यांना नामदार आमदार अजित दादा पवार यांनी बुथ कमेटी लवकरात लवकर करावे असे म्हटले यावेळी महाराष्ट्रातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र ना अजितदादा पवार यांच्या हस्ते देण्यात आले
अनिल मालगे यांनी आपले नियुक्ती चे क्षेय आमदार अमोल दादा मिटकरी ,माजी आमदार प्रा.तुकाराम भाऊ बिडकर महानगर जिल्हाध्यक्ष विजय भाऊ देशमुख यांना दिले अशी माहिती अनिल मालगे यांनी दिली