अंजनगाव उपाधीक्षक भूमि अभिलेख यांची शेतकऱ्यासोबत असभ्य वागणूक
एकच काम आहे का ? उपअधीक्षक भूमी अभिलेख
अंजनगाव सुर्जी (मनोहर मुरकुटे )
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी यांच्या शेताच्या मोजणी मध्ये मोजणी अधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत संगणमत करून 2 मीटर शेत तक्रार कर्त्याचे शेतात काढल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित चौकशीची माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी अरेरावीची भाषा वापरल्याने भूमी अभिलेख कार्य कार्यालय गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे की शेतकऱ्यांचा अपमान करण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
सविस्तर वृत्त असे की अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी प्रवीण साहेबराव लबडे यांचे शेत सर्वे नंबर 185 आहे प्रवीण लबडे यांचे शेताची 9 मार्च 2019 ला मोजणी अधिकारी सदाशिव रांजणकर यांनी मोजणी केली होती. आणि त्यांची ‘क’ प्रत सुद्धा त्यांना मिळाली होती. परंतु दोन वर्षांनी शेजारी सौ.निर्मला गणेश लबडे यांनी 18 एप्रिल 2023 ला भूमी अभिलेख कार्यालय मार्फत मोजणी केली .ज्या मोजणीत दोन मीटर शेत प्रवीण लबडे यांचे शेतात काढण्यात आले. ही मोजणी भुमिअभिलेख कार्यालयातील मोजणी अधिकारी श्रीमती जी.आर .सोनवणे यांनी केली होती. परंतु मोजणीच्या दिवशी प्रवीण लबडे यांच्या घरी चुलत भावाचा मृत्यू झाल्याने ते मोजणीला हजर राहू शकले नव्हते, आणि तशी माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती .परंतु प्रवीण यांच्या मागे मोजणी अधिकारी सोनवणे यांनी मोजणी करून दोन मीटर शेत त्यांचे शेतात काढल्याने एकाच कार्यालयाची परंतु दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी केलेली मोजणी यात तफावत आल्याने प्रवीण लबडे यांनी तहसीलदार अंजनगाव सुर्जी यांच्याकडे तक्रार करून मोजणी अधिकारी श्रीमती जी.आर .सोनवणे यांचे विरोधात तक्रार दाखल केली होती .त्यावर तहसीलदार अंजनगाव यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना 28 एप्रिल 2023 ला पत्र देऊन संबंधित तक्रारीची चौकशी करून व यथोचित कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल तक्रारदारास कळविण्याचे पत्र दिले होते . ज्या संदर्भात आज दिनांक 18 मे ला तक्रारदार प्रवीण लबडे यांचे बंधू हे भूमी अभिलेख उपाधीक्षक यांना माहिती विचारण्यास कार्यालयात गेले असता मला एकच काम आहे का? मी फक्त तुमच्यासाठीच बसलो आहे का? असे म्हणून शेतकऱ्याला केबिन मधून जायला सांगून तुमच्या तक्रारीला दोन महिनेही लागू शकतात तीन महिनेही लागू शकतात असे सांगितले. उपाधीक्षक भूमी अभिलेख यांची ही वागणूक शेतकऱ्याला मानसिक त्रास देणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी असून अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
भूमि अभिलेख कार्यालयातील श्रीमती जी.आर .सोनवणे या मोजणी अधिकाऱ्यांनी प्रवीण लबडे यांनी तक्रार केल्यानंतर एक मीटर जागा तुम्ही घ्या ,एक मीटर जागा घेण्यास समोरच्या व्यक्तीला मी सांगते असा फोन केल्याने भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहेत की सेटलमेंट करण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.?