दोन अपंग सेवानिवृत्त लोकांना वारसा हक्काने न्याय मिळाला नसल्याने आमरण उपोषण
चांदुर रेल्वे
तालुका प्रतिनिधी
नगर परिषद चांदूर रेल्वे मध्ये अनिल वामन वानखडे व कैलास महादेव वानखेडे यांची सफाई कामगार म्हणून सन 1997 व 1998 मध्ये नियुक्ती झाली होती. 21 वर्षे सेवा देऊन आरोग्य ठीक नसल्यामुळे दोघांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती 2018 घेतली. नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी मंजूर करून त्यांना सेवानिवृत्ती दिली. व त्यांच्या मुलांना वारसा हक्काने नोकरी देण्याचे आश्वासन दिले नंतर नगरपरिषद मधील मुख्याधिकाऱ्यांनी ही नोकरी फक्त मेहतर, भंगी समाजालाच देता येते दुसऱ्या अनुसूचित जाती लोकांना देता येत नाही असे सांगितले . अशा 11 प्रकारचे त्रुट्या आम्हाला सांगितल्या परंतु आम्ही 11 प्रकारच्या त्रुट्या शासकीय देऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले . तरीसुद्धा मुख्याधिकारी यांनी वरिष्ठांना सफाई कामगार नसून मजूर म्हणून सांगून चुकीची माहिती दिली 2016 च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जातीमधील कुठल्याही समाजाला वारसा हक्क देता येते असे परिपत्रकात दिल्यावर मुख्याधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय देतो असे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक दिनांक 16/ 7/ 2019 रोजी क्रमांक 3 अनुसूचित जाती मधील इतर कर्मचाऱ्यांना वारसा हक्क किंवा नातेवाईकांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा क्रमांक 5 मध्ये अनिल वामनराव वानखडे स्वच्छ निवृत्ती रिक्त झालेल्या सदरचे सफाई कामगार या पदावर त्यांचे वारस सौरभ अनिल वानखडे यांना शासन निर्णय वाचा क्रमांक 1मधील मुद्दा क्रमांक 3अनुषंगाने नियुक्ती देण्यात यावी असे आदेश मुख्याधिकारी यांना दिले. तथापि सदर बैठकीत सेवा विषयक बाबीची येथे खातरजमा करून संदर्भ 1अनुषंगाने नियुक्ती देण्याची आवश्यक कारवाई करण्याबाबतची सूचित करण्यात आले. आणि मागील उपोषण उठविण्यात आले परंतु अजून पर्यंत नियुक्तीच्या आदेश देण्यात आले नाही 2019 पासून नगरपरिषद, उपविभागी कार्यालय ,जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सतत पत्र व्यवहार करीत असून सन १९९८ मध्ये 5 सफाई कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये 1 वारसा हक्काने मुख्याधिकारी यांनी नियुक्ती दिली आहे .कुठलीही वरिष्ठांचा मार्गदर्शन न घेता मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषद मधून ही नियुक्ती करण्यात आली परंतु त्यामधीलच कैलास महादेव वानखडे यांच्या मुलगा अंकुश कैलास वानखडे यांना अजून पर्यंत नियुक्ती मिळाली नाही 2018 ते 2024 पर्यंत 6 वर्षाचा कालावधी यामध्ये गेला असून अनिल वामनराव वानखडे व कैलास महादेव वानखडे अपंग सफाई कर्मचारी नगरपरिषद पुढे दिनांक 4 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषणाला बसले आहे.