खेळ व क्रीडा
Check Also
Close
मेलबर्न / नवप्रहार मीडिया
क्रिकेट खेळात आलेल्या नवीन नियमांमुळे क्रिकेट खेळ अधिक आकर्षक झाला आहे. सध्या T 20 आणि अन्य सामन्यात गोलंदाजांची होणारी धुलाई पाहता क्रिकेट मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळेच क्रिकेटला अनिश्चितेचा खेळ म्हटल्या जाते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात फलंदाजाने असा गगनचुंबी शॉट मारला की चेंडू आकाशात गायब झाला ?
मेलबर्न रेनेगेड्स आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामन्यावेळी मॅजिकल सिक्स बघायला मिळाला. मैदानावरील खेळाडूंसह कॅमेऱ्यांनासुद्धा चेंडू शोधता आला नाही आणि सगळे आकाशाकडे बघत होते.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बेन मॅक्डेर्मोटने जबरदस्त फटका मारला. त्याने वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर पुढे येत उंच फटका मारला. चेंडू वेगाने सीमारेषेबाहेर जात होता. पण मधेच कॅमेरामनला चेंडू दिसणं बंद झालं. चेंडू स्टेडियमच्या छतावर अडकला आणि पुन्हा खाली पडलाच नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बेनने फटका मारल्यानंतर चेंडू वरती गेला. तो छताला अडकल्याने कॅमेऱ्यात नंतर दिसला नाही. यावेळी मैदानातील खेळाडूंनासुद्धा नेमकं काय झालं हे कळलं नाही. पंचांनी षटकार दिला पण त्यांनाही हसू आवरता आले नाही.
मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध होबार्ट हरिकेन्सने हा सामना सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मेलबर्नचे सलामीवीर ढेपाळले. मात्र, जॉर्डन कॉक्सच्या ४७ धावांच्या जोरावर संघाने २० षटकात १४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोरी एंडरसन आणि सॅम हॅन यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर होबार्टने सामना ६ गडी राखून जिंकला. कोरीने ४१ तर सॅमने ५१ धावा केल्या. तर मॅक्डेर्मोटने २५ धावांची वेगवान खेळी केली.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!