सामाजिक

आश्चर्यम …..!  रुग्णवाहिका खड्ड्यात गेली आणि मृत व्यक्ती झाला जिवंत ! 

Spread the love

80 वर्षाच्या वृद्धासाठी खड्डा ठरला जीवनदायी 

हरियाणा / नवप्रहार मीडिया 

                रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक लोकांना जीव गमवावा लागला असल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. पण रस्त्यावरील याच खड्ड्यांमुळे कोणाचा जीव परत आला हे तुम्ही वाचले आहे काय ? नाही न.. ! चला तर जाणून घेऊ या खड्डा कसा ठरला मृत व्यक्ती साठी जीवनदायी.

                  या आश्चर्य कारक घटने संदर्भात अधिक माहिती अशी की , दर्शन सिंग ब्रार यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. तसेच त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता. दर्शन सिंग यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव पतियाळा येथून कर्नालजवळील निसिंग येथील त्यांच्या घरी घेऊन जात होते. जिथे त्यांचे अंतिम संस्कार होणार होते. अंत्यसंस्कारासाठी गावात लाकडे देखील गोळा करण्यात आली. मात्र, मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे टायर अचानक रस्त्यावरील खड्ड्यात गेलं आणि जोराचा धक्का बसला.

ब्रार कुटुंबीयांनी दावा केला आहे की, रुग्णवाहिकेत त्यांच्यासोबत असलेल्या दर्शन सिंग यांच्या नातवाने त्यानंतर त्यांना त्यांचा हात हलवताना पाहिलं. तसेच हृदयाचे ठोके देखीव जाणवू लागल्याने त्यांनी रुग्णवाहिका ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले.

तेथे डॉक्टरांनी दर्शन सिंग यांना जिवंत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांना कर्नाल येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. सध्या दर्शन सिंग यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान कुटुंबीयांनी या घटनेला चमत्कार म्हटले आहे आणि आता दर्शन सिंग लवकर बरे व्हावेत अशी आशा व्यक्त केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close