नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कार्यवाही करा” जय विदर्भ पार्टीचे निवेदन
नागपूर / प्रतिनिधी
नागपूर शहरात व संपूर्ण विदर्भात मकरसंक्रातीनिमित्त पतंगबाजीला उधाण येते, जानेवारी – फेब्रुवारी यादरम्यान मोठ्या प्रमाणावर पतंग उडविल्या जातात. पूर्वी पतंगबाजीसाठी तयार केला जाणारा मांजा साध्या धाग्याचा, काचा, शिरस आदी साहित्याचा वापर करून तयार केला जात होता. मात्र गेल्या काही वर्षापासून नायलॉन अर्थात चीनी मांजा वापरल्या जात आहे. हा मांजा अनेक नागरिकांसाठी, पशु –पक्ष्यासाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. जेव्हा की नायलॉन मांजा वर महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र. CRT-2015/CR-37/T.C. 2/TC-1 दि : 29/12/2022 नुसार बंदी असूनही विक्रेते, दुकानदारांकडून प्रशासनाचा धाक नसल्याने उघडपणे विकल्या जात आहे. दुसऱ्याची पतंग कापण्यासाठी आता बहुतांश पतंग उडवीणारे मोठया प्रमाणावर बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करतात.
नायलॉन मांजामुळे अनेक वाहनचालकांचे गळे कापले गेल्याची अनेक घटना समोर येत आहे व अपघातग्रस्त व्यक्तीस उपचारास कसर केल्या गेल्याचाही घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. या सर्व घटनांचे गांभीर्य जाणून यापुढे नायलॉन मांजाने जर अपघात घडला तर त्या व्यक्तीच्या उपचारासाठी नियम न सांगता त्वरित उपचार व्हावा. तसेच नायलॉन मांजा विक्रेत्यांवर व वापरकर्त्यां विरोधात आपल्या कडून छापेमारीची कारवाही करून कठोर दंड वासुल्ण्यात यावा व अपघात झाल्यास दोषीविरुद्ध भा.दं.वि. ३०२ अन्वये गुन्ह्या दाखल करून त्वरित कार्यवाही करण्यात यावी. या आशयाचे निवेदन अप्पर पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील व उपजिल्हाधिकारी श्री. सुभाष चौधरी यांना देण्यात आले.
जय विदर्भ पार्टीचे शिष्टमंडळात पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, कार्यकारी शहर अध्यक्षा एड. मृणाल मोरे, शहर सचिव नरेश निमजे, दक्षिण नागपूर विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सतई, पूर्व नागपुर शहर विधान क्षेत्र कट्टर विदर्भ वादी नेता तारेश दुरुगकर, विठ्ठलराव मानेकर, प्रशांत तागडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.