असभ्य वर्तणुक करणार्या डाँक्टरवर गुन्हा दाखल करा
अखिल भारतीय आदिवासी विकास परीषद,नवी दिल्ली (महा.शाखा)यांची ठाणेदार
पोलीस स्टेशन दर्यापूर 37 यांना मागणी*
दर्यापुर — कैलास कुलट —
दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे नियमितप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु असतांना एक आदिवासी ७ ( सात ) महिन्याची गर्भवती महिला सोनोग्राफी करण्याकरीता डॉ.प्रकाश तायडे यांचेकडे त्यांच्या नियोजित दिवशी ( सोमवार ) तपासणीकरीता गेली असता आदिवासी महिलेची सोनोग्राफी न करता ‘तुझ्या अंगाचा वास येत आहे,तू हात पाय धुवून ये, मगं तुझी सोनोग्राफी करतो’ असे म्हटले. त्यामुळे ती महिला हातपाय धुवून आली, तरी डॉ.प्रकाश तायडे यांनी तिला पुन्हा दुसऱ्यांदा हातपाय धुण्यास सांगितले, ती महिला पुन्हा हातपाय धुवून आली असता तिची सोनोग्राफी केली परंतु तुझ्या अंगाचा वास येत असल्यामुळे तुझ्या सोनोग्राफीचा अहवाल सर्वात शेवटी देण्यात येईल असे म्हटले व तिला सर्वात शेवटी अहवाल दिला. उपजिल्हा रुग्णालयामध्ये होत असलेल्या अशोभनीय कृत्याबाबत आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी एका आदिवासी महिलेसोबत अशी गलिच्छ वागणूक देणे योग्य आहे काय? डॉक्टर प्रकाश तायडे यांचा स्वतःचा खाजगी दवाखाना असून तेथे येणाऱ्या रुग्णाशी अशी वागणुक का? करीता डॉक्टरांचे कर्तव्य न करता रुग्णाला विनाकारण त्रास देणाऱ्या अशा डॉक्टरावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल न करेपर्यत आम्ही पोलीस ठाण्यात ठिया आंदोलन करु असा निर्वानीचा ईशारा दिला. संघटनेचे पदाधिकारी आक्रमक भुमीकेत होते. ठाणेदार यांनी योग्य तपासणी करुन गुन्हा दाखल करु.असे आश्वासन दिल्यानंतर संघटनचे पदाधिकारी शांत झाले निवेदन देतेवेळी अशोक चव्हाण जिल्हाध्यक्ष, अ.भा.आ.वि.परीषद नवी दिल्ली, विलास वाघमारे,महा.प्रदेश सचिव, सुरेश सोळंके,राजेश पवार,मयुरी पुनम,आदित्य चव्हाण,महादेव चव्हाण ईत्यादी संघटनचे पदाधिकारी उपस्थित होते.