विलास शिंदे यांची राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्कारासाठी निवड
अमरावती / प्रतिनिधी
दी ०१.०१.२०२४ कळसुबाईचे शिखर मंदिर अकोले जिल्हा नगर येथे होणारा *दिव्यांग ऊर्जा पुरस्कार* साठी अमरावती महावितरण कार्यरत अति. कार्यकारी अभियंता श्री विलास शिंदे यांची निवड झाली आहे.
विलास शिंदे हे पायाने दिव्यांग असून उच्चशिक्षित आहे. अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणी प्राविण्य प्राप्त केली आहे. एशिया खंडातील सर्वात मोठी महावितरण वीज कंपनीमध्ये अमरावती येथे कार्यरत आहेत.
राष्ट्रीय पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टींग स्पर्धेत पाच वेळा सुवर्णपदक प्राप्त केले . एशियन गेम्स (साऊथ कोरिया) संघात प्रतिनिधीत्व केले होते.अमरावती पॅरा असो. अध्यक्ष असून अनेक दिव्यांग क्रीडापटू त्यांनी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय पॅरा स्विमर कांचन पांडे व आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग चॅम्पियन रवींद्र काळे यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे . दिव्यांग क्रीडा स्पर्धा घेणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण दिव्यांग बांधवांसाठी फॉर्म उपलब्ध करून देणे दिव्यांग शिबिर व कार्यशाळा आयोजित करणे दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करणे , सर्कुलर उपलब्ध करून देणे हे कार्य सतत चालू असतात. *आदरणीय मा. राज्यमंत्री आ. बच्चुभाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय मंत्री दर्जा) यांच्या मार्गदर्शन मूळे हे शक्य झाले आहे .दिव्यांग क्षेत्रातील अतुलनीय व प्रेरणादायी ऊर्जादायक कार्य केल्यामुळे त्यांना *दिव्यांग ऊर्जा पुरस्काराने२०२४* सन्मानित करण्यात येत आहे.