क्राइम

त्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश

Spread the love

गडचिरोली / नवप्रहार मीडिया

                  गडचिरोली शहरापासून 16 किमी अंतएअवर असलेल्या पुरळ  पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला होता. मारेकऱ्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी योग्य तपास कर्तव्य तरुणीच्या मारेकऱ्याला शोधून काढले आहे.

            .याप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 22 डिसेंबर रोजी पोर्ला जंगलात 19 वर्षीय अनोळखी युवतीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.

यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तिच्या डोक्यातून रक्तस्राव झालेला होता, चेहऱ्यावर व्रण होते. तसेच मृत युवतीची ओळख पटवून तिच्या खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान गडचिरोली पोलिस दलासमोर होते. आता याबाबत माहिती समजली आहे.

पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक तसेच फिंगर प्रिंट विभागातील अधिकाऱ्यांनाही घटनास्थळावर पाचारण करण्यात आले.

गडचिरोली शहरातील एका गोपनीय बातमीदाराने चंद्रपूर येथून एक 19 वर्षीय युवती बेपत्ता असल्याची माहिती दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मृतदेहाचे फोटो दाखवले असता मृत मुलगी त्यांचीच असल्याची खात्री नातेवाईकांनी दिली.

दरम्यान, या युवतीचे वैरागड येथील निखिल मोहुले याच्याशी प्रेमसंबंध होते. तिला भेटण्याकरीता निखिल मूल येथे गेला होता. त्यानंतर पथकाने वैरागड येथून निखिल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close