विदेश

……अन त्याने बागेत  खेळत असलेल्या चिमुकल्याला उचलून नेले

Spread the love

व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

मुंबई / नवप्रहार मीडिया

                 गरुड का पक्षात विशालकाय पक्षी म्हणून ओळखला जातो. तो आकाशात असतांना सुद्धा त्याची नजर जमिनीवर असते. गरुड पक्षाचे अनेक व्हिडीओ  सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात त्याला कधी समुद्र किंवा नदीतून मासोळी, जमिनीवरून साप  जंगलातून शेळी, मेंढी,  इतकच काय तर चिता किंवा बिबटच्या पिल्लाला देखील उचलून घेऊन जातो.  पण आम्ही ज्या व्हिडीओ ची चर्चा करणार आहोत त्याबद्दल ऐकून तुमच्या अंगावर देखील शहारे उभे राहतील.

           या व्हिडिओत आपण पाहू शकता की एक कुटुंब बागेत पिकनिकसाठी आलेल आहे. त्यांच्या सोबत असलेला लहान मुलगा हा बागेत खेळत आहे.त्याचे वडील देखील त्याच्या सोबत खेळत असतात. पण काही क्षणासाठी त्यांची मुलावरील नजर हटते आणि इतक्यात गरुड त्या मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न करतो. तो त्या लहानग्याला आपल्या पंज्यात घेऊन काही क्षण उडण्याचा प्रयत्न करतो. पण मुलाचे वजन जास्त असल्याने  त्याला मुलाला घेऊन उडता येत नसल्याने तो त्याला सोडून देतो.

हे सगळं घडलं तेव्हा बाळाचे वडिल जवळच उभे होते आणि ते बाळाला पकडण्यासाठी धावले. तो पर्यंत गरुडाने बाळाला सोडून दिलं होतं, ज्यानंतर वडिलांनी बाळाला उचललं, बाळ आता ठिक आहे, परंतू थोड्या उंचावरुन पडल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

एनिमल_किंगडम0007 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गरुडाशी संबंधित हा धोकादायक व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘गरुडाने मुलावर हल्ला केला.’ मात्र, अनेक लोक या व्हिडिओला खोटा देखील म्हणत आहेत. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचं दिसत आहे. पण तो नक्की कुठला आहे आणि कधी काढला गेला? याची पुष्टी झालेली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close