खासदारांचे निलंबन लोकशाही विरोधी
इंडिया आघाडीची केंद्र सरकार विरोधात निदर्शने .
नांदगांव खंडेश्वर तालुका प्रतिनिधी.
. – इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या १४६ खासदारांचे निलंबन हे लोकशाही विरोधी असून भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आपला फॅसिस्ट अजेंडा राबवित असल्याचा आरोप करीत इंडिया आघाडीतील भाकप , माकप, राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे तिव्र निदर्शने केली .१३ डिसेंबर ला संसदेची सुरक्षा भेदून दोन युवकांनी लोकसभेच्या प्रेक्षक दिर्घेतून मुख्य सभागृहात उड्या मारणे हि बाब संसदेच्या व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने निश्चितच गंभीर असल्यामूळे या घटनेची मुख्य जबाबदारी गृहमंत्री अमित शहाची आहे . देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात येवून या घटनेवर निवेदन द्यावे व त्या युवकांना संसदेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशिका देणाऱ्या भाजप खासदाराची चौकशी करण्याची मागणी इंडिया आघाडीतील घटक पक्षाच्या खासदारांनी केली होती . हि मागणी मान्य करून या घटनेवर संसदेमध्ये नियमानुसार चर्चा घडवून आणणे शक्य असतांना सुद्धा सरकारचा सुरक्षिततेच्या बाबतीत गलथान कारभार जनतेपुढे येईल या भितीपोटीच सरकारने विरोधी सदस्यांचे निलंबन केले आहे . हा सरळ सरळ लोकशाही व्यवस्थेचा खुन असून विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत देशाचा कारभार हाकण्याची गंभीर चुक भाजपा सरकार करीत आहे . मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीना हटविणे , इंडियन पिनल कोड , क्रिमीनल प्रोसिजर कोड , एव्हिडन्स ॲक्ट यांना बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ , भारतीय न्याय संहिता २०२३ व भारतीय साक्ष अधिनियम २०२३ या नव्या कायदयांना विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत असंवैधानिक पद्धतीने सरकारने मंजुर केले आहे . बेरोजगारी , महागाई व शेतकऱ्याच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करून सरकार आपला मनुवादी अजेंडा पुढे रेटत आहे . सरकारच्या या लोकशाही व संविधान विरोधी कृत्याचा इंडिया आघाडीतील घटक पक्ष , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , भारतीय कम्युनिस्ट पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) च्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या व या जनविरोधी संविधान विरोधी सरकारच्या विरोधात संघर्ष तिव्र करण्याचे जनतेला आवाहन केले . यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ . सुनिल मेटकर ,, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ .श्याम शिंदे , तालुका सचिव संतोष सुरजुसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मो . साजिद , कॉ .संजय मंडवधरे , राजेंद्र राऊत, रुस्तम भाई, सुरेश सोनगडे, पंकज घेवारे,विनोद तरेकर, कॉ .नारायण भगवे ,रुस्तम भाई ,माधव ढोके , हरिदास देशमुख ,राजूभाऊ राऊत , चित्राताई वंजारी , सुनंदाताई ढोके , गजानन गंदे , वासुदेव चौधरी ,रामदास मते , रामराव शिंदे , अविनाश कणसे , राजगुरू शिंदे ,देवेंद्र कंठाळे ,पंकज घेवारे , अशोक केसरखाने , पुंडलिक पुंड,हितेश शेळके ,समशेर खाँ पठाण , चेतन साळवान ,कांतेश्वर पुंड , जितेंद्र घोडे , अमोल शिरभाते, हितेश शेळके, जितेंद्र घोडे, सलीम भाई, नाजिम भाई, रिजवान भाई, आमिर सोहेल, गौरव भोयर, सागर गावंडे सागर गावंडे , गौरव भोयर ,अनिल मासुदकर , इस्राईल शहा ,रमेश उघडे , संजय वानखडे सह कार्यकर्ते उपस्थित होते .