पैशासाठी पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार
आई वडिलासह चार आरोपी अटकेत तर एक फरार.
साकोली तालुक्यातील धक्कादायक प्रकार
साकोली: इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला तिच्या आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडद या गावी उघडकीस आला आहे. पीडितेच्या काकूच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सहा आरोपीना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पीडित मुलगी साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता 12 विमध्ये शिक्षण घेत आहे. गावावरून ये जा करण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील आपल्या काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांने तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसांपासून पीडिते सोबत बोलणं झाले नसल्याने तिच्या काकाने तिला 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. याप्रकरणी तिच्या काकूने पुढाकार घेत पीडितेसह साकोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. पैशासाठी पोटच्या मुलीला आई वडिलांनी ओळखीच्या काही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. महिनाभरात तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले. पीडितेच्या गावातील घरीच आई वडिलांच्या समक्ष तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई वडीलसह इतर चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर आरोपी हिंगणघाट येथील असल्याचे कळते. या प्रकरणी विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पैशासाठी पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार
आई वडिलासह चार आरोपी अटकेत तर एक फरार.
साकोली तालुक्यातील धक्कादायक प्रकार
साकोली: इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय स्वतःच्याच मुलीला तिच्या आई वडिलांनी पैशासाठी विविध व्यक्तींकडून सामूहिक अत्याचार करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडद या गावी उघडकीस आला आहे. पीडितेच्या काकूच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सहा आरोपीना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पीडित मुलगी साकोली येथील एका महाविद्यालयात इयत्ता 12 विमध्ये शिक्षण घेत आहे. गावावरून ये जा करण्यासाठी त्रास होत असल्याने ती साकोली येथील आपल्या काकाकडे राहून शिक्षण घेत होती. मात्र कालांतराने पीडितेच्या वडिलांने तिला गावाला नेले. बऱ्याच दिवसांपासून पीडिते सोबत बोलणं झाले नसल्याने तिच्या काकाने तिला 14 डिसेंबरला फोन करून तिच्या प्रकृतीची आणि कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी पीडितेने घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला. याप्रकरणी तिच्या काकूने पुढाकार घेत पीडितेसह साकोली पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. पैशासाठी पोटच्या मुलीला आई वडिलांनी ओळखीच्या काही व्यक्तीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बळजबरी केली. महिनाभरात तिच्यावर कधी एकांतात तर कधी सामूहिकरित्या अत्याचार करण्यात आले. पीडितेच्या गावातील घरीच आई वडिलांच्या समक्ष तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर मारहाण करीत अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल होताच साकोली पोलिसांनी पीडितेच्या आई वडीलसह इतर चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर आरोपी हिंगणघाट येथील असल्याचे कळते. या प्रकरणी विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून अटक झालेल्या सर्व आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संजय खोकले हे करीत आहेत.
साकोलीतील वडद गावात ही घटना घडली आहे. ज्यामध्ये एका अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. तिला पैशासाठी विकण्यात आला. या घटनेत तिच्या आई वडिलांचा पण सहभाग आहे. यामध्ये एकूण सात आरोपी आहेत. त्यात सहा आरोपीना अटक झाली आहे. तर एक फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा