सामाजिक

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

Spread the love

लेकीचा बर्थडे साजरा करण्यासाठड गेला होता सासुरवाडीत 

बीड / नवप्रहार वृत्तसेवा 

सासरच्या जाचाला कंटाळून सून आत्महत्या करते अश्या अनेक घटना घडतात. पण लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासुरवाडीत गेलेल्या जावयाने सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे,. बीडच्या बाभळगाव इथं हा प्रकार घडला आहे. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील लोणी येथील नितीन विनायक शेळके (वय 32 वर्ष) याचा विवाह बीडच्या माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बाबळगाव येथील रूपाली हिच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला. लग्नाच्या सहा महिन्यांपासून शेत वाटून घे, आई-वडिलांपासून वेगळे राहू म्हणून पत्नी व सासरची मंडळी नितीनला मानसिक व शारीरिक मनस्ताप द्यायची.

दोन अपत्य (मुली) असलेली रूपाली ही बाळंतीण असल्याने बाभळगाव येथे आहे. यातच नितीन व रूपाली यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन हा सासरवाडीला बाभळगाव येथे आला होता. सासरवाडीत आल्यानंतर पत्नी रूपाली नितीन शेळके, सासू आशाबाई रुस्तुम सुरवसे, सासरा रुस्तुम सुरवसे व मेहुना पवन रुस्तुम सुरवसे यांनी मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून नितीनने विष प्राशन करत आत्महत्या केली. दरम्यान नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात आत्महत्यास प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close