विदेश

विद्यापीठाच्या वस्तीगृहात आग ; 14 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू , 18 जखमी 

Spread the love
 

बगदाद / नवप्रहार वृत्तसेवा

 
                       इराकच्या उत्तरेस असलेल्या सोरण शहराच्या एरबील मधील विद्यापीठाच्या वसतिगृहात लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 18 विध्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाला रात्री आगीवर नियंत्रण मिळविण्यात याच आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये शुक्रवारी सायंकाळी भीषण आग लागली. हॉस्टेलमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थीही होते. आरोग्य विभागाचे प्रमुख कमारम मुल्ला मोहम्मद यांनी सांगितलं की, सोरन शहरातल्या विद्यापीठातील इमारतीला आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
इराकचे पंतप्रधान मसरूर बरजानी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की,“पीडित कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून चौकशी सुरू झाली आहे.” आगीचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. दुर्घटनेतील जखमींना सोरन शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close