खेळ व क्रीडा

स्व.आलोक पोळ स्मृतिप्रित्यर्थ धामणगावात ९ डिसेंबर पासून ४१ वी राज्यस्तरीय मुलीची हँडबॉल स्पर्धा

Spread the love

 

हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व बी पॉझिटिव्ह स्पोर्ट्स अँड एज्युकेशन अकॅडमीचा पुढाकार
तिन दिवस राहणार हँडबॉलचा महाकुंभ

राज्यातील २६ नामांकित संघ होणार सहभागी

धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी

हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व बी पॉझिटिव्ह स्पोर्ट्स अँड एज्युकेशन अकॅडमी च्या वतीने स्व.आलोक पोळ स्मृतिप्रित्यर्थ येथे
९ डिसेंबर पासून तीन दिवसीय १९ वर्षा आतील ४१ व्या राज्यस्तरीय मुलीची हँडबॉल स्पर्धा आयोजित केली असुन राज्यातील २६ नामांकित संघ सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली

धामणगाव येथील बी पॉझिटिव्ह स्पोर्ट्स अँड एज्युकेशन अकॅडमी ही संस्था सामाजिक ,शैक्षणिक , सांस्कृतिक क्रीडा, क्षेत्रात विविध उपक्रम राबवतात यंदा १९ वर्षा आतील ४१ व्या राज्यस्तरीय मुलींची हँडबॉल स्पर्धा ९ डिसेंबर पासून तीन दिवस आरोही रिसॉर्ट अँड लॉन येथे आयोजित केली आहे या स्पर्धेत मुंबई, पुणे कोल्हापूर, नागपुर ,सांगली अकोला संभाजीनगर सह राज्यातील २६ नामांकित संघ सहभागी होणार आहे स्पर्धेत विजेत्या संघाला पहिले पुरस्कार स्व आलोक सुरेश पोळ स्मृति प्रित्यर्थ,दूसरे पुरस्कार स्व सुभाषरावजी बापुरावजी बुटले यांच्या स्मृति प्रित्यर्थ,तीसरे पुरस्कार स्व सतिशजी व्यवहारीमलजी बुधलानी तसेच गोल्ड मेडल स्व लिलाबाई पुरुषोत्तमजी मुंदडा यांच्या स्मृति प्रित्यर्थ , सिल्वर मेडल स्व विनायकराव धनाजी चौधरी स्मृति प्रित्यर्थ, ब्रॉन्ज मेडल स्व भाऊलालजी मिश्रीलालजी भंसाली स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणार आहे सोबतच. विविध सम्मान चिन्ह आणि मेडल ने विजेत्या खेळाडूंना गौरविण्यात येणार असल्याचे बी पॉजिटिव स्पोर्ट्स एंड एज्युकेशन अकॅडमी चे अध्यक्ष विलास बुटले यांनी सांगितले

धामणगावात निघणार रॅली

राज्यातील सहभागी संघाच्या खेळाडूची ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता महावीर भवन येथून गांधी चौक, मेन लाईन शास्त्री चौक शिवाजी चौक अशी रॅली निघणार आहे तीन दिवसीय होणाऱ्या स्पर्धेवेळी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी श्री रविंद्र गायकवाड हैंडबॉल एसोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष , श्री राजाराम राऊत सर प्राप्त श्री शिव छत्रपति पुरस्कार. हैंडबॉल एसोसिएशन महाराष्ट्र सचिव ,
श्री रुपेश दादा मोरे प्राप्त श्री शिव छत्रपति पुरस्कार सह सचिव हैंडबॉल एसोसिएशन इंडिया,
उपस्थित राहणार असून जय्यत तयारीला सुरुवात झाली असल्याची माहिती बी पॉझिटिव्ह स्पोर्ट्स एंड एज्युकेशन अकॅडमी क्लबचे अध्यक्ष विलास बुटले, उपाध्यक्ष विक्रम बुधलानी, सचिव राज रगडे, सहसचिव निखील भंसाली, यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी वैभव इंदानी, सुमित बोराखडे,अंकित पोळ, सुनील जावरकर,श्रीकांत टाले,चेतन राऊत , प्रणव लुनावत, अमोल तिनखेडे आणि तसेच बी पॉझिटिव्ह स्पोर्ट्स एंड एज्युकेशन अकॅडमी क्लबचे सर्व सदस्य व अमरावती जिल्ह्यातील नामांकित हँडबॉल खेळाडू उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close