महात्मा फुले आधुनिक भारताचे मार्टिंग ल्युथर किंग – प्रा.सुदाम चिंचाणे.
अंजनगाव सुर्जी : मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील नगर परिषदेच्या सभागृह येथे दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी सामाजिक क्रांतीचे जनक व सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकरी समतेच्या तंत्रज्ञानावर आधारीत वर्तमान बहुजन समाज निर्मिती करिता युवकांची जबाबदारी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन भारतीय पिछडा ओबीसी शोषीत संघठन, महाराष्ट्र व लोकसंवाद सामाजिक परिषद अंजनगाव सुर्जी वतीने करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सुप्रसिध्द विचारवंत प्रा सुदाम चिंचाणे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अनिल वर्हेकर होते.
यावेळी फुले शाहू आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन प्रामाणिक प्रयत्न करावा.असे प्रा सुदाम चिंचाणे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की, महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य महान आहे महात्मा फुले हे आधुनिक भारताचे मार्टिंग ल्युथर आहे.त्यांची सामाजिक क्रांती ही फार मोठी आहे.हंटर कमिशन समोर भारतातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण,द्यावा हे इंग्रजाना ठणकावून सांगितले, आणि स्वतः शाळा काढून जातीवादी व्यवस्थेला हादरा दिला.पण बहुजन समाजाला दिसलेल्या अधिकाराचा आताच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे.शिक्षणाचे खाजगीकरण करून बहुजन समाजाला गुलाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच प्रत्येक हक्क अधिकार स्वतंत्र आपल्याला जे मिळाले ते जर टिकून ठेवायचे असेल तर तरुण युवकांसाठी पुढाकार घेऊन,फुले शाहू आंबेडकरी चळवळ गतिमान करावी. असा मोलाचा संदेश, यावेळी प्रा. सुदाम चिंचाणे यांनी दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन लोकसंवाद सामाजिक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी केले तर प्रास्ताविक गजानन कविटकर यांनी केले व आभार प्रदर्शन ललित ढेपे यांनी केले .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल हाडोळे, जयेंद्र गाडगे, श्रीकांत नाथे, रमेश सावळे, भाऊराव वानखडे,मुकेश वानरे, ललित ढेपे, सविता पेटकर, अश्विनी पेटकर, चारुलता हाडाळे, चक्रधर हाडोळे, मयूर जाधव,सुरज पवार, विनोद हाडोळे,विरु बोरोळे, गजानन चांदुरकर,यांनी अथक परिश्रम घेतले.