दर्यापुरातील सहकार महर्षीचा पुतळा हटविण्याचा प्रयत्न फसला
(नागरिकांच्या विरोधानतंर पुतळ्याची पुनर्स्थापना
आमदार बळवंत वानखडे यांनी दिली घटनास्थळाला त्वरित भेट
दर्यापुर(ता.प्रतिनिधी
)दर्यापुर तालुक्यातील सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री स्व.एन.यु.उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांचा शिवर रोडवरील जिनिग च्या आवारात असलेला पुतळा अचानक पणे काढून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न काही भागधारक व देशमुखां सह इतरांचा विरोध केल्याने अयशस्वी झाला.सहकार महर्षी स्व.आण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन काळात परिसरातील शेतकर्याच्या भागभांडवलातून बनोसा येथील मध्यवर्ती भागात सहकारी शेतकी जिनिग अॅड प्रेसीग ही संस्था स्थापन केली होती.एकेकाळी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकर्याचा कापुस खरेदी करून त्यापासून रूई तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येत होता.त्यावेळी संस्था आर्थिक भरभराटी वर होती.अण्णासाहेबाच्या निधना नंतर त्यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याची ओळख भविष्यात काम करणार्या तरून पिढीला असावी या उद्देशाने जिनिंज प्रेसींग च्या आवारात त्यांचा सुशोभित पुतळा उभारण्यात आला होता. कालांतराने तत्कालीन संचालक मंडळाने बनोसा (दर्यापुर) भागातील जिनिंगची जागा विकून शिवर रोडवर नविन शेत घेवून त्याठिकाणी जिनिंगचे स्थानानतंरण करण्यात आले.त्यावेळी आण्णासाहेब देशमुख यांचा पुतळा त्यावेळच्या पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या हस्तेसुद्धा त्याठिकाणी उभारण्यात आला होता.नंतरच्या काळात अकार्यक्षम संचालका मुळे व स्वार्थी व्यवस्थापक गोकुळ भडांगे यांच्यामुळे जिनिंग प्रेसींग डबघाईस आल्याने उत्पादन बंद पडले. यामुळे आण्णासाहेब देशमुख यांच्या पुतळ्या कडे व्यवस्थापणाचे दुर्लक्ष होत गेले.त्याठिकाणा वरून त्यांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी उभारावा अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र संचालक व व्यवस्थापकानी मागणी कडे दुर्लक्ष केले. ग्रामपंचायत शिवर ची कुठली परवानगी न घेता ती जागा ही लेआउट करता विकण्यात आली बुधवारी अचानक दुपारी काही कामगार पाठवून चबुतर्या वरून पुतळा छन्नी हातोड्याच्या सहाय्याने काढण्यात आला.याची माहिती संस्थेच्या काही भागधारक व नागरिकांना मिळताच तात्काळ त्याठिकाणी धाव घेवून या प्रकाराला विरोध करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकानी सदर पुतळा न हलवीता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले.काढलेल्या पुतळ्याला सन्मानपुर्वक हारार्पण करून नागरिकांनी उपस्थितीत त्याच चबुतर्या वर पुतळ्याची पुन्हा स्थापणा करण्यात आली. वरील प्रकरण आमदार बळवंत वानखडे यांना मिळतात त्यांनी पुढील प्रोग्राम बाजूला सारून लगेच शिवर रोडला घटनास्थळ काढले व संबंधित अशी बोलून योग्य नसल्याच्या सूचना दिल्या व तेथून ते पुढील कार्यक्रमाकरिता रवाना झाले