क्राइम

सराफा व्यवसायी मंडले चा खुनी गवसला

Spread the love
गवंडी काम करणाराच निघाला खुनी 
अमरावती / नवप्रहार मीडिया 
             जिल्ह्यातील तिवसा येथील सराफा व्यवसायी संजय मंडले यांच्या खुन्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी आरोपीचे नाव जाहीर केले नाही. 
                दि. २७ नोव्हेंबर क्या रात्री तिवसा येथील सराफा व्यवसायी संजय मंडले यांची पत्नी आणि मुलगा आरोग्य प्रॉब्लेम असल्याने अमरावती येथे दवाखान्यात गेले असताना घरात एकटे असलेल्या संजय यांची हत्या करण्यात आली होती. पत्नी आणि मुलगा परतल्यावर ही घटना उजेडात आली होती. या घटनेने शहरात खळबळ माजली होती.  आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. 
                   या नंतर ही पथके आरोपीचा शोध घेत असताना त्यांच्या घरी गवंडी काम करणाऱ्या देऊरवाडा येथील व्यक्तीवर त्यांना शंका आली. त्याला ताब्यात घेण्यात आले . त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजत आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून आरोपीचे नाव जाहीर केले नाही. 
               
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close