संघर्षातून साकारल्या गेले संत तुकाराम महाराज चौक सौंदर्यीकरण…
तेल्हारा दि :- शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक नाव देण्या संदर्भात व सौंदर्यीकरना बाबत मोठा संघर्ष करावा लागल्यामुळेच तेल्हारा येथील आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री ना. आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते माजी नगरसेवक रामभाऊ फाटकर यांचा सत्कार करण्यात आला.
तेल्हारा शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाला काही वर्षांपूर्वी मानकर चौक म्हणून संबोधले जात होते परंतु ते नाव अधिकृत नसल्यामुळे या चौकाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाव देण्यासाठी व तिथे मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरण करण्याचे काम करण्यासाठी तेल्हारा नगर पालिकेच्या माजी अध्यक्षा सौ.कान्होपात्रा रामभाऊ फाटकर व माजी न.प. सदस्य रामभाऊ फाटकर यांनी अनेकांच्या तक्रारीला व विरोधाला न जुमानता अधिकारी व सहकार्यांना विश्वासात घेऊन जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक सौंदर्यीकरनाचे काम आवश्यक ते सर्व ठराव घेऊन पूर्ण केल्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौकाचे नव्याने सौंदर्यीकरण करण्यात आले त्या लोकार्पण सोहळा निमित्ताने कुणबी युवक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री
ना. आकाशदादा फुंडकर यांनी रामभाऊ फाटकर यांचा सत्कार करून सन्मान केला या वेळी , प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री आ. संजय कुटे ,आ.प्रकाश भारसाकळे माजी आ. नारायणराव गव्हाणकर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.