सामाजिक

” आज या व्यवस्थेने आमची अर्धी मान कापली आहे ” – माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील

Spread the love

जवाहरनगर /सागर बागडे

आज आमची आई दुसऱ्याचे घरचे भांडी कुंडी घासते आहे,मीठ मिरची कुठून आणून देते, अन् आमचं भाऊ पाच किलो धान्य घेऊन दारू पिऊन असते हे मुद्दाम चाललेले आहे सर्वांना लुड पांगड करून ठेवायचे.ज्या संविधानाची गोष्ट आपण करतो तो स्वाभिमान कुठे आहे? आम्ही कुणाच्या लालसेत जाऊन,त्यांची चमचेगिरी करतो याचा विचार करण्याची गरज आहे .इथे आम्ही मुकादमाला मालक केला हा देश सांभाळण्यासाठी त्यांच्या ताब्यात देश दिला ,आमच्या पूर्वजांनी संविधान तयार केला व भारताला अर्पण केला याची मुख्य अपेक्षा होती बंधुता, आज बंधुता आहे का? समाज समाजात नफरत ताकत निर्माण झाली आहे, जीचा मुकाबला करण्याची जबाबदारी कुणाची आहे ज्या बाबासाहेबांचे नाव घेता किंवा फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेता,२०१४ नंतर नोकर भरती झाली का? चिमुकल्या मुलांचे भवितव्य काय आहे,याना नौकऱ्या मिळणार आहेत काय,गेल्या दहा वर्षात जूनी पदे काही भरले गेली नाही,नवीन पदे निर्माण केली गेली नाही,आणि जुन्या पदावर नवीन सक्कल काढली जाऊन एवढया गंभीर अवस्थेत पंत प्रधान मित्र,मुख्यमंत्री मित्र बनवायला निघाले,जे हे समजतील की हे आपले मालक आहेत,आज या व्यवस्थेने आमची अर्धी मान कापली गेली पुढे.पूर्ण मानही कापली जाणार हे आतातरी जनतेनी समजले पाहिजे असे बोचरी टीका उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमात केले.
भारतीय संविधान दिन कार्यक्रम आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा येथील मल्टीपरपज बहुउद्देशिय सभागृह (एम. पी हॉल) येथे दोन दिवसीय कार्यक्रमातील पहिल्या दिवसीय उद्घाटकिय कार्यक्रमांत मुख्य वक्ता भाषणात कोळसे पाटील बोलत होते व्यासपीठावर
आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा चे महाप्रबंधक सुनिल सप्रे,समता सैनिक दल महाराष्ट्र बौद्धिक प्रमुख भास्कर कांबळे, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे तैलचित्राचे पूजन व भारताचे संविधान प्रस्ताविकतेचे वाचन करण्यात आले.
आयुध निर्माणी जवाहरनगर, भंडारा चे महाप्रबंधक सुनिल सप्रे, यांनी प्रास्तविक भाषणात भारताचे एक सार्वभौम,समतावादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही,गणराज्य घडविण्याच्या व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक,आर्थिक,राजनैतिक, न्याय्य,विचार,अभिव्यक्ती, विश्वास श्रध्दा व उपसना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता हे संविधानाची आत्मा आहे असे विचार मांडले,तर
समता सैनिक दल महाराष्ट्र बौद्धिक प्रमुख भास्कर कांबळे यांनी सध्या भारतीय राजकारण
व भारतीय संविधान यावर आपले मत नोंदविले आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जावळेकर तर प्रास्ताविक अमोल मेश्राम यांनी केले, कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधान दिनानिमित्त रुचिका नंदेश्वर यां चिमुकली मुलीने कविता सादर केली आभार धीरज कुकवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता सचिन टेमभूर्णेकर, अमित मानकर, देवेंद्र गेडाम, आतिश दुपारे,यश गेडाम, राहूल नांदगाये,धीरज कुकवार,
जितू मेश्राम, सुधीर वासनिक, विनोद बागडे चंद्रशेखर मेश्राम,निशांत बागडे, रजनीश बागडे, निशांत बागडे, प्रविण वालके,कैलाश बावणे,आकाश चवरे , सुधिर वासनिक,सचिन शाहू,अनिल तिरकाम,अमोल राहूलगडे,मोहन मिना, प्रफुल देसपांडे, सुरेश तांडे, विकास सावले ,सुभाष मेसराम
तथा संविधान दीन समारोह समिती,समता सैनिक दल व, डेमोक्रेटिक मजदुर संघटना ,आयुध निर्माणी कर्मचारी व अधिकारी वर्गाचे विशेष योगदान लाभले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close