सामाजिक न्याय विभाग बार्टी अंतर्गत संविधान दीन साजरा
मंगरूळ दस्त /प्रतिनिधी
संविधान सप्ताह अंतर्गत दिनांक 26 /11 /2023 रोजी संविधान दिन महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका मंगरूळ दस्तगिर इथे संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक न्याय विभागा अंतर्गत समतादूत सरोज आवारे ,सरपंच सतीश हजारे पोलीस उपनिरीक्षक विनोद वासेकर उपस्थित होते फोटोचे पूजन व संविधान उद्देश पत्रिकेचे वाटप करण्यात आले उपस्थित विद्यार्थ्यांना समतादूत सरोज आवारे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या ज्या संविधानाने व्यक्ती स्वातंत्र्य दिले व मूलभूत अधिकार दिले त्या संविधानाचा गावातील प्रत्येक ग्रामस्थांमध्ये प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे युवा पिढीला हा वारसा पुढे चालून संविधानातील अधिकाराची जाणीव होणे गरजेचे आह तसेच सरपंच यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संविधान सप्ताहाच्या मार्फत गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे पोलीस उपनिरीक्षक वासेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले संविधानातील अधिकार आणि मिळालेले व्यक्ती स्वातंत्र्य समाजाचा विकास करण्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे आहे त्यात तसेच संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित अभ्यासिका मधील विद्यार्थी स्वप्निल फलके ,सुमित पवार, प्रणय बनसोड, आदित्य हिंगोली ,चेतन सावंत शिवम अलोने ,सोनू पठाण रोशन पडदा, अजय ठाकरे साक्षी देवरे प्रांजली पटले व सरपंच सतीश हजारे पोलीस उपनिरीक्षक विनोद वासेकर समतादुत सरोज आवारे व ग्रामस्थ होते