सामाजिक

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “कार्तिक यात्रोत्सव”

Spread the love

 

पंचक्रोशी, चंदन उटी, काकडा-समाप्ती,भव्य-महाप्रसाद, मांड-वाढवा, सेवाधारी भाविकांचा सत्कार इ. विविध कार्यक्रम

चांदुर रेल्वे / प्रतिनिधी

*चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २७/११/२०२३ सोमवारला सकाळी ७.०० वाजता संस्थानच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे उपस्थितीने भजनासह “पंचक्रोशीचे” कार्यक्रमाला संस्थानमधून प्रारंभ होणार आहे. दुपारी ४.०० वाजता संस्थानमध्ये “चंदन-उटी” कार्यक्रम, रात्री ७.०० वाजता चौघडा व आरतीनंतर भाविक भक्त व बाल गोपालसह “कार्तिक मास काकडा-समाप्ती”, रात्री ८.०० वाजता सर्व बाहेर गावातील भाविक भक्त व गावकरी मंडळी करिता “भव्य-महाप्रसाद” आयोजित करण्यात येणार आहे.


*दिनांक २८/११/२०२३ मंगळवारला सकाळी ९.०० वाजता संस्थानमध्ये “कार्तिक मास अखंड भजन मांड वाढवा” मुख्य मंदिरातून आरंभ होवून असंख्य भाविक-भक्तसह पूजा व भजनाचे गजरात लहान मंदिरातील बसविलेली ढाल उठवून मुख्य मंदिराचे सभा मंडपात मांडीचा वाढवा पंच आरतीने भाविकांना गुलाल लावून करण्यात येईल.यानंतर ज्या भाविकांनी या मांडी मध्ये दिवस पाळीत भजन व इतर सेवा दिली, अशा सेवाधारी भाविकांचा टोपी, शेला, कपडे व रोख रक्कम देवून विश्वस्त मंडळाचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.*
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close