दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या तिघे झाले जखमी …एकाची प्रकृती गंभीर सावंगी ला उपचारर्थ केले दाखल
आर्वी , प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी ; वर्धा मार्ग सारंगपूरी टी पॉईंट जवळ दोन दुचाकी एकमेकाला धडकल्याने एक गंभीर जखमी झाला तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी तारीख चार ला दुपारी चार वाजता घडली
मिळालेल्या माहितीप्रमाणे MH32A-U6758 क्रमांकाच्या दुचाकीने संतोष पडोळे रा. आर्वी हा जनता नगर कडून आयटीआय कॉलेजला जात होता तेवढ्यात वर्धे कडून आर्वी कडे MH32A-R5115 क्रमांकाची दुचाकी वेगाने येत दुचाकी चालक शंकर लांडगे रा. त्रिमूर्ती नगर वर्धा वय (40) यांना ही दुचाकी दिसताच त्यांनी दुचाकीचे जोरदार ब्रेक मारले मात्र दू चाकी वेगात असल्याने समोरील दुचाकीला भिडली त्यामुळे दोघेही दुचाकी स्वार रस्त्यावर पडले मात्र वेगात गाडी असल्याने ब्रेक मारल्याने रस्त्यावर पडून शंकर लांडगे हे गंभीर जखमी झाले त्यांचे सोबत असणाऱा मनीष कठाने रा. वर्धा वय (42) हा व्यक्ती किरकोळ जखमी झाला
आर्वी वर्धा रोडवरील स्थानिक रहिवाशी यांनी सामाजिक कार्यकर्ते रामू राठी यांना घटनेची माहिती दिली असता रामू राठी व मित्र परिवाराने तातडीने घटनास्थळ गाठले आणि आर्वी पोलीस स्टेशन ला माहिती दिली. घटनास्थळी आर्वी पोलिसांनी धाव घेतली, खाजगी ॲम्बुलन्स बोलावून उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल केले. शंकर लांडगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सेवाग्राम येथे पाठवण्यात आले तसेच मनीष कठाणे व संतोष पडोळे हे किरकोळ जखमी झाले याची नोंद पोलिसांनी घेतली घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी सायंकाळी सात वाजता दिली
फोटो … जखमींना उपचारार्थ सेवाग्राम ला नेत असताना