सामाजिक

सापन नदी कालव्यात बुडून दोन बालकांचा करून अंत

Spread the love

मोही फाटा गावातील घटना 
अचलपूर प्रतिनिधी –किशोर बद्रटिये : – अचलपुर तालुक्यातील वझर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोही फाटा गावातील दोन चिमुकल्यांचा गावा लगत वाहणार्या कालव्यात बुडून करून अंत झाल्याची हृदय दायक घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ सुमारास घडली .
प्राप्त माहितीनुसार अचलपूर तालुक्यातील वझर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मोहीफाटा या गावातून सपन धरणाचा मुख्य कालवा वाहतो या कालव्या शेजारी राहणाऱ्या आरुष मनीष बेटे वय . २ वर्षे , व आयुष गणेश बेठे वय २ वर्षे हे चिमुकले मुलं आपल्या घरासमोर खेळत असताना खेळता खेळता ते काल्याच्या दिशेने गेले . तोल गेल्याने दोन्ही बालके कालव्यात पडली . कालव्यात वाहणाऱ्या पाण्यात पडूनत्यांचा करून अंत झाला घटनेची माहिती होताच शोधात शोध सुरू झाली असता आरुष बेठे याचा मृतदेह कालव्यात वाहून काही अंतरावर , झुडपात आढळला रात्री च्या सुमारास आढळला तर आयुष्य गणेश बेटे याचा मृतदेह दुसऱ्या रोजी मंगळवार सकाळी कालव्यात आढळला . आयुष्य चा मृतदेह रात्रभर कालव्या पडला असल्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यां नी
मृतदेह कुर्तडला होता . घटनेची माहिती होताच ठाणेदार संदीप चव्हाण घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम हाती घेतली होती दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणी करिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून गावात शोकाकळा पसरली आहे .
( वझर धरणातून मोही फाटा या गावा लगत वाहणाऱ्या सापन नदीच्या मुख्य कालव्याची गेल्या अनेक दिवसा पासुन साफसफाई न झाल्यामुळे त्यात मोठमोठी झाडे झुडपे तयार झाली आहे त्यात अनेकदा गावकऱ्यांची गुरेढोरे पडत असतात परंतु यावेळी या दोन बालकांचा देखील याच कालव्यात बुडून अंत झाल्याने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून स्थानिक अधिकारी कर्मचारी घटनास्थळी ही आले नसल्याने त्या विभागाच्या कामा विकदध रोष निर्माण झालेला आहे )

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close