सामाजिक

भव्य शेतकरीसमूह घेऊन नितीनजी कदम धडकले जिल्हाधिकारी कार्यालयवर

Spread the love

 

दुष्काळपरिस्थितीचा प्रश्न तापला

मांगण्या पूर्ण न झाल्यास साखळी उपोषणाचा दिला इशारा

प्रतिनिधी / अमरावती :

स्थानिक बडनेरा ग्रामीण भागामध्ये सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न मंगरी लागत नसून इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याची उमेद आता इथल्या शेतकऱ्यांना राहिली नाही अश्या प्रकारची परिस्थिति दिसून येत आहे. सोबतच भातकुली तालुक्यातील शेतकरी वर्ग हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. पावसावर येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे. परंतु योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदराला निराशा पडली. आधीच हवालदिल झालेल्या शेतकार्याचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. अश्यातच संपूर्ण परिस्थितीचा वास्तविक आढावा घेतल्यानंतर शेतकरी आंदोलनात सक्रिय असणारे समाजसेवी नितीनजी कदम यांनी आज शेकडो शेतकऱ्यासोबत आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतीचे स्वतः पाहणी करून व सत्यपरिस्थितीवर आधारित पंचनामे सादर करून भातकुली तालुक्यातील भागामध्ये कोरडा दुष्काळ घोषित करून संपूर्ण नुकसान भरपाई करण्याचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले. सदर परिस्थितीचा पाठपुरावा करून मांगण्या पूर्ण होत नसेल तर लवकरच साखळी उपोषण करु अश्या प्रकारची चिथावणी यावेळी नितीनजी व समस्त शेतकऱ्यांनी दिली.या साखळी उपोषणाची तारीख लवकरच माध्यमांद्वारे जाहीर करू अशी माहिती यावेळी देण्यात आली.गेल्या काहीं महिन्यांपासून आत्तापर्यंत नितीनजी यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी आंदोलने झालीत पण प्रशासन – शासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मातीमोल करित असल्याचं प्रतिपादन नितीनजी यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रियेत दिले.यावेळी शेकडो शेतकरी निवेदन स्थळी दाखल झाले होते.*
*यामध्येच प्रवेश कदम, अक्षय धूडस,अभिषेक सवाई, स्वप्निल मालधुरे, सागर पंचबुद्धे, आकाश पाटील, बाबसाहेब पाटील, विनोद पतालिया, सोपान भटकर,दिनेश ठाकरे, सचिन देशमुख, भोजराज कोलटेके, किशोर जोगी, शफी भाई, बाबुलाल वानखडे, मोहम्मद भाई, संदीप कोलाटेक, गजानन लेंडे, शंकर बरडे, बाबू गवणेर, नितीन मालपानी, निलेश लढ्ढा, उमेश मानकर, प्रकाश गोरटे, गजानन सवाई, चेतन रेहपाडे, रोशन सनके, अर्पण भजभुजे, प्रफुल्ल महल्ले, आकाश मानकर, किशोर घोंगडे, मोहन भातकुलकर व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close