शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्या. – शेतकरी मित्र नवनीत महाजन.
अरविंद वानखडे
यवतमाळ
मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ३० ऑक्टोंबर रोजी होत असून शासन अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ देणार आहे.
मात्र या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अद्यापही लाभ मिळाला नसून शेतकरी आत्महत्या चा जिल्हा म्हणून सर्वत्र प्रचलित असून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हा प्रवक्ता व शेतकरी नेते नवनीत महाजन यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासन आपल्या दारी या मंडप स्थळी निवेदन देणार अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनेक शासकीय लाभां पासून वंचित असून गेल्या दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा जिल्ह्यातील 75 टक्के शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही लाभार्थी पात्र असून लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसून शासनाने जिल्ह्यात झालेला ओला दुष्काळ घोषित केला नसून अनेक शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे अद्यापही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. सोयाबीन वरती आलेल्या येलो मोझेक रोगाने तर अक्षरशा शेतकऱ्यांचे उभे पिक वाया गेले असून याकडे सुद्धा शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाच्या वेळ काढूपणामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या शासन भाग पाडत आहे.तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक निराधार यांना तीन ते चार महिन्यापासून निराधार योजनेचा लाभ मिळाला नसल्याने निराधार योजनेचे लाभार्थी अनेक अडचणीचा सामना करत आहे.त्याकरिता यवतमाळ येथे ३० तारखेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची व्यथा शासनाच्या दारी माडण्या करिता शेतकरी मित्र नवनीत महाजन शेकडो शेतकरी बांधवांना घेऊन निवेदन देणार आहे तरी शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या व्यथा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पुढे मांडणार आहे.