सामाजिक

अवास्तव वाढीव कर आकारणी बाबत अंजनगाव शहरात जन आक्रोश

Spread the love

अंजनगाव सुर्जी शहरामध्ये करण्यात आलेली अवाढव्य वाढीव घर टॅक्स रद्द करण्याबाबत निवेदन सादर

 प्रशासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम 

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या माध्यमातून गेली वर्षभरापासून अंजनगाव शहरातील सर्व मालमत्तांचे स्थळ निरीक्षण केले अंजनगाव सुर्जी शहरामध्ये नागरिकांचे घरांचे सर्वेक्षणामध्ये लावण्यात आलेला घर टॅक्स हा गरीब, कष्टकरी शेतमजूर व सर्व जनतेला मान्य नाही. अशा प्रकारची चुकीची कर आकारणी केलेली आहे,अशीकेलेली घर टॅक्स वाढ हि १०% असते परंतु अंजनगाव नगर परिषदेने आपल्या पदाचा दुरुपयोग करून अंजनगाव सुर्जी शहरावर जबरदस्तीने दुप्पट ते चौपट घर टक्स वाढ केली आहे. सदरची घर टॅक्स वाढ ही कोणत्याही प्रकारची मान्य नसून त्याबाबत शहरात सर्वत्र नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे ,
तसेच न प ने नेमून दिलेल्या कंत्राटदाराणे सर्वेकशन करतांना एकाच घराचे दोन भाग दाखवून त्या घरांचे वेगवेगळे फोटो, दाखवून व वेगवेगळी टॅक्स आकारणी करून ग्राहकांना नोटीस देण्यात आल्या या प्रकारच्या फार मोठ्या चुका यामध्ये दिसून आल्या आहेत
याबाबत नुकतेच भारतीय जनता पार्टीचे माजी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, समता परिषदेचे विपुल नाथे यांनी आठ दिवसाचा निवेदनाद्वारे अल्टिमेट दिला असून सदरचा वाढीव घर टॅक्स निर्णय ताबडतोड रद्द करून वाढीव केलेली कर आकारणी त्वरित रद्द करून जनतेपर्यंत रद्द झाल्याचा आदेश काढून जनतेपर्यंत निर्गमित करावा.असे निवेदनात म्हटले आहे
जर हि घर टक्स वाढ रद्द न केल्यास मोठ्या प्रमाणात जन-आंदोलन छेडून दिनांक- १३/११/२०२३ पासून भाजपचे मनोहर मुरकुटे, संजय नाठे, गणेश पिंगे,सुनील माकोडे,,महात्मा फुले समता परिषद च्या वतीने व इतरही पदाधिकारी, कार्यकर्ते ह्यांचे वतीने आमरण उपोषण व जन आंदोलन छेडण्यात येईल तरी आपण दिनांक 26/10/2023 ते 5/11/2023 या कालावधीत रद्द करावा,अन्यथा जर यामध्ये काही अघटित घडल्यास सर्व घटनेस आपण स्वतः जबाबदार राहाल याची आपण नोंद घ्यावी.असे सुद्धा निवेदन कर्त्यांनी आपल्या निवेदनातं म्हटले आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close