अंजनगाव सूर्जी च्या प्रा.प्रवीण शेळके यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.

अंजनगाव सूर्जी, मनोहर मुरकुटे
स्थानिक अंबा नगर येथील श्री. रमेश शेळके यांचे सुपुत्र व सध्या इंडीयन मिलिटरी स्कूल पुलगाव जिल्हा वर्धा येथे कार्यरत असलेले इंग्रजी विषयाचे प्रा.प्रवीण रमेश शेळके यांचा नुकताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
15 ऑगस्ट 2023 रोजी इंडीयन मिलिटरी स्कूल पुलगाव तर्फे हर शिखर तिरंगा ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.त्या अंतर्गत आपल्या स्वातंत्र्य दिनी हिमालय पर्वत रांगातील 6111 मीटर उंचीच्या माउंट युनंम शिखरावर आपल्या भारताचा तिरंगा फडकावला गेला. या मोहिमेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये देशप्रेम व फिटनेस बद्दल जाणीव आणि जागृती निर्माण करणे होता.या मोहिमेचे नेतृत्व प्रा.शेळके यांनी आपल्या पाच माजी विद्यार्थ्यांच्या चमूला लीड करत केले होते. इंडीयन मौंउंटनिरींग फाउंडेशन दिल्ली मान्यताप्राप्त ही मोहीम शिक्षक आणि विद्यार्थी मिळून आयोजित भारतातील एकमेव मोहीम होती.अतिशय खडतर अशी मोहीम यशस्वी झाल्यावर भारताचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण टीमला बोलावून त्यांचे अभिनंदन केले होते..
त्याच मोहिमेच्या यशानिमित्य दिनांक 17/ 10/2023 रोजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नागपूर येथील शासकीय निवास स्थान देवगिरी येथे शेळके सर आणि त्यांचा विद्यार्थी सागर कुंभारे यांचा सत्कार केला.तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या..
विद्यार्थी आणि शिक्षक मिळून मिळालेल्या या यशाकरिता शेळके कुटुंबातील संजय शेळके सर, चंद्रशेखर शेळके,अनिल शेळके, किशोर शेळके, मुकेश शेळके यांनी आनंद व्यक्त केला. तर लाला झंवर,छोटू पाटील, विशाल हंतोडकर आशिष राठी, नईम मेमन,जिग्नेश पंचमीया,कमलेश पर्वतकर, मनीष टाक, मुरली हाडोळे पत्रकार मनोहर मुरकुटे , इत्यादी मित्र मंडळीनी प्रा.प्रवीण शेळके व त्यांच्या चमू चे अभिनंदन केले..