Uncategorized

लग्नात घडला असा प्रकार की नववधू पोहचली थेट हॉस्पिटलात

Spread the love

मुंबई / पी संजय

                                                    लग्न हा प्रकार सध्या  दोन जीवांचे मिलन किंवा दिन कुटुंबातील नाते असे राहिले नसून लग्न सोहळा हा आगळावेगळा ठरावा .पाहुण्यांनी नाव घ्यावे आणि मित्र मंडळीत लग्नाची काही दिवस चर्चा राहावी यासाठी अनेक व्यक्ती धडपडतांना दिसतात. आपल्या लग्नात काहीतरी वेगोय व्हावे यासाठी ते प्रयत्नशील असतात. पण असे एक्सपेरिमेन्ट कधी कधी घातक ठरू शकतात याची त्यांना कल्पना नसते. असाच काहीसा प्रकार एका लग्नसोहळ्यात घडला आहे. स्पार्कल गन सह पोज देने एका नववधूला चांगलेच महागात पडले आहे. पोज देतांना स्पार्कल गन मध्ये स्फोट झाल्याने नववधूचा चेहरा जळला आहे. त्यामुळे तिला सासर ऐवजी हॉस्पिटल मध्ये जावे लागले आहे.

 अलीकडे प्री-वेडिंग फोटोशूट, लग्नात वधूला डोलीवरून आण्यापासून ते अनेक गोष्टींचा ट्रेंड पाहायला मिळतोय. पण या आनंदाच्या क्षणात कधी कधी अशा काही घटना घडतात, ज्याचा आपण कधी विचारचं केला नसतो. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात लग्नमंडपात स्टंट करताना नवरीचा अपघात होतो ज्यामुळे तिला थेट रुग्णालयात न्यावे लागते. हा व्हिडीओ पाहून जो तो अवाक झाला आहे. याशिवाय नेटकरी विविध कमेंट करत आहेत.

भारतात लग्न सोहळ्यात स्टंटबाजी खूप कॉमन गोष्ट झाली आहे. पण ही स्टंटबाजी अनेकदा जीवावर कशी बेतते याची जाणीव या घटनेतून होतेय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर आणि वधू स्पार्कल गनसह पोज देताना दिसत आहे. दोघेही पोजच्या तयारीत स्पार्कल गन ऑन करतात यावेळी वधूच्या हातातील गनचा अचानक मोठा स्फोट होतो आणि तिच्या चेहऱ्यावर आगीचा एक मोठा लोळ आदळतो. यावेळी अतिशय घाबरलेली वधू पटकन हातातील बंदूक फेकून देत वेदनेने किंचाळत असते. यावेळी आजाबाजूला लग्नासाठी आलेले पाहूणे पटकन वधूच्या मदतीसाठी धावून येतात. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला जात आहे.

ट्विटरवर @Sassy_Soul_ नावाच्या एका युजरने या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर केला आहे. 13-सेकंदाच्या क्लिपमध्ये वधू-वर स्टेजवर हातात स्पार्कल गन घेऊन पोज देताना दिसत आहेत. मात्र गनचा स्फोट होताच वधूचा चेहरा भाजतो.

“आजकाल लोकं काय चुका करत आहेत ते ओळखा. लोक लग्नाच्या दिवसांत पार्टी असल्याप्रमाणे वागत आहेत आणि मग अशाप्रकारे ते त्यांचा एक चांगला दिवस खराब करत आहेत’, असं या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

एका ट्विटर युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘डर लग गया देख कर’, त्याचवेळी दुसर्‍या एका युजरने म्हटले की, ‘नवीन भीती अनलॉक झाली.’ तर तिसऱ्या एका युजरने , ‘शुभ मंगल सावधान’ असे लिहिले आहे. , व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. काहींना नवरीच्या अवस्थेची कीव येते, तर काहीजण तिची खिल्ली उडवत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close