अपघात

पुलावरील कठड्या अभावी गर्भवती महिलेने गमावला जीव

Spread the love

दुसऱ्या दिवशी पहाटे मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून लागला शोध

चंद्रपूर / नवप्रहार मीडिया

                   पुलाच्या कठड्या अभावी एका महिलेला प्राणास मुकावे लागल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बल्लारपूर येथे घडला आहे. मय्यत महिला ही तीन महिन्यांची गर्भवती होती. रात्रभर शोधाशोध सुरू असताना दुसऱ्या दिवशी पुलाखालून येणाऱ्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाजावरूनया अपघाता बद्दल कळले.

बल्लारपूर शहरातील बामनी येथे वास्तव्यास असलेल्या पुष्पा काकडे या आपल्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी स्कुटीने घराबाहेर पडल्या. पण त्या परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी एकच शोधाशोध सुरु केली. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्थानकात देखील तक्रार नोंदवली. शोधाशोध सुरु झाल्यानंतर पहाटे वर्धा नदीच्या पुलाखाली मुलाच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी पुष्पा या मृतावस्थेत सापडल्या. घटनास्थळी पोलिसांना पुष्पा आणि त्यांना कवटाळून बसलेला चार वर्षांचा मुलगा सापडला. या संपूर्ण घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दु:खासह संताप देखील व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या पुलावरुन आतापर्यंत अनेक अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. बल्लारपूर येथे असलेल्या या पुलाला कठडाच नाही. त्यामुळे अनेक अपघातांचं सत्र या पुलावर सुरु असतं. त्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला. परंतु तरीही या पुलाच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या पुलाच्या प्रश्नावरुन गावकरी संतप्त झाल्याचं म्हटलं जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close