स्व. रामदास भैया दुबे नगरपरिषद शाळेत नितु’ज कलेक्शन आगळं वेगळं प्रदर्शन
मुर्तिजापुर ( विशेष प्रतिनिधी)
अनिल डाहेलकर
नुकतेच माणुसकी फाऊंडेशन संलग्न यांच्यामार्फत स्व. रामदास भैया दुबे नगरपरिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा टांगा, चौक पोस्ट ऑफिस समोर, मुर्तीजापुर जिल्हा अकोला या शाळेमध्ये प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे श्री द्वारकाप्रसादजी दुबे माजी नगराध्यक्ष श्री देविदास आप्पा गोळे माजी नगरसेवक श्री निजामभाई ललकार माजी नगरसेवक रफिक भाई कुरेशी माजी नगरसेवक श्री मुन्ना श्रीवास सर्पमित्र श्री नुपेन अरोरा प्रमुख उपस्थिती श्री जयदीप सोनखासकर सर प्राचार्य इंदिरा गांधी विद्यालय मुर्तीजापुर या सर्वांच्या उपस्थितीत दिनांक 16 ऑक्टोंबर 2023 वार सोमवार रोजी सकाळी 09 am ते 01Pm यावेळेत प्रदर्शन खुले होते. सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, सर्व नागरिक सर्व पालक यामध्ये सहभागी झाले. या प्रदर्शनामध्ये
२०० + पेक्षा अधिक देश विदेशातील दुर्मिळ चलनी नोटा तसेच पॉलीमर ( प्लास्टिक ) च्या विविध प्रकारच्या नोटा आणि १५० पेक्षा जास्त देशातील नाणी
@ विविध प्रकारच्या माचिस / काड्या पेट्यां चा संग्रह
@ पोस्टाचे तिकीटे , एफ.डी.सी कवर आणि माहिती पत्रके
@ बाॅंड पेपर्स , पत्ते , कॅसेट
@ त्रुटी असणाऱ्या नोटा आणि नाणी
@ जन्म तारीख / साखरपुडा / लग्न वाढदिवस आणि महत्वाच्या तारखेच्या नंबर असणाऱ्या नोटा ऑन डिमांड उपलब्ध
@ शिवकालीन आणि मुघल काळातील नाणी , सोन , चांदी , तांबे, पितळी लोखंडाचे,आणि प्लास्टिक चे दुर्मिळ नाणी इत्यादी वस्तूचे प्रदर्शन होते या प्रदर्शनासाठी संग्रहकर्ता नितेश पवाने शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप झोडपे सर श्री विशाल अंबडकर सहाय्यक शिक्षक सौ शुभांगी येऊल शिक्षिका श्री दीपक भाऊ हांडे खुशबू महाजन संजीवनी भगत श्रीमती अनिताताई देवके सौ सुषमा बाळापुरे इतर उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद
नितु’ज कलेक्शन आगळं वेगळं प्रदर्शन