निमखेड बाजार सरपंचपदी कुलदीप पवार बिनविरोध
अंजनगाव सुर्जी.तालुका. प्रतिनिधी
निमखेड बाजार येथील सरपंचपदाची आज दि,१३ला फेरनिवड झाली असुन कुलदीप पवार हे बिनविरोध सरपंचपदी विराजमाण झाले आहे.
निमखेड बाजार ग्राम पंचायतचे सरपंच विपीन अनोकार यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचाअडिच वर्षानंतर राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवार दि.१३ला ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी कुलदीप पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राऊत साहेब यांनी कुलदीप पवार यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत निमखेड बाजार चे
ग्रामसेवक कळसकर साहेब, तलाठी ढोके मॅडम,ग्रामपंचायत माजी सरपंच विपिन अनोकार, उपसरपंच प्रेमदास वानखडे,सदस्य रेखा तंतरपाडे, रेखा संदीप गिरे, संगीता निलेश निंबाळकर, कोकिळा वर्रजीकवार पवार, गावातील नागरिक निलेश घोडेराव, अतुल पवार, अमोल पवार, विनोद टेकाडे, दिनेश तनपुरे, गावकरी मंडळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.