शेतकऱ्याचा जंगली प्राण्याचा हल्लात मृत्यू
.वरुड / दिनेश मुळे
वरुड तालुक्यातील शेंदुरजनाघाट येथील नवेगाव येथे राहत असलेले माधव बानाईत (६५) यांच्या मानेवर मागच्या बाजुने जंगली प्राण्याने प्राणघातक हमला करूzन रक्तबंबाळ केल्याने या हमल्यात त्यांचा जागीच मुत्यु झाला आहे.
माधव बानाईत हे रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता तिवसाघाट येथुन जवळच असलेल्या चारबन शेतशिवारातील शेतात गेले होते. त्यांचा मुलगा मोहन बानाईत व त्याची पत्नी सुद्धा शेतातील मंदिरात पुजा करण्यासाठी दुपारी २.३० वाजता गेले होते. तेव्हा त्याचे वडील शेतात काम करत होते. त्या नंतर मोहन गावात आला व परत ५.३० वाजता शेतात गेला असता त्याचे वडिल त्याला शेतात आढळून आले नाही. त्याला वाटले की ते शेतातुन घरी गेले असावे म्हणुन तो परत घरी आला परंतु त्याचे वडील घरी सुद्धा आले नसल्याने मोहन व त्याचा भाऊ पदमाकर हे परत आपल्या वडिलांना शेतात शोधण्यासाठी गेले असता त्यांना त्यांचे वडील शेतात दिसुन आले नाही. त्यांनी शेताच्या आजुबाजुला शोधाशोध केली असता त्यांना त्यांचे वडील मुत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांनतर त्यांनी सदर प्रकरणी शे.घाट पोलिस स्टेशन ला येवुन माहिती दिली. ठानेदार सतिश इंगळे यांनी आपल्या कर्मचा-यासह रात्री ९.३० वाजता घटनास्थळी धाव घेत मूतकाची व घटनास्थळाची पहानी केली असता त्यांच्या असे लक्षात आले की कुठल्यातरी जंगली प्राण्याने त्यांच्या मानेवर मागुन प्राणघातक हल्ला केल्याने या हल्यात त्यांचा मुत्यु झाला असावा. परंतु मानेवर झालेला हल्ला बघता हा हल्ला वाघाने केल्याची सर्वत्र चर्चा आहे. सदरील चर्चा संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली असता शेतक-यांच्या मनात भितीचे वातावरण पसरले आहे.