क्राइम

आयुवैदिक मसाज सेंटर च्या नावावर चालत आहे वेश्याव्यवसाय 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया 

                         पाश्चात्य संस्कृतीचा एक भाग असलेले स्पा सेंटर ने आता भारतातील मेट्रोसिटी सह लहान मोठ्या शहरात आपले दुकान मांडले आहे. शारीरिक मसाज ,पंचकर्म अश्या सुविधेच्या नावावर या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असतो हे अनेक वेळा पोलिसांच्या सामाजिक विभागाने टाकलेल्या धाडीनंतर समोर आले आहे. पुण्यात देखील  हडपसर, चंदननगर, वानवडी, कोरेगाव पार्क, विमानतळ येथील अनेक उच्‍चभ्रू भागांत ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’ चालू झाले आहेत; परंतु या ठिकाणी ‘मसाज’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसाय केला जात आहे. त्यामुळे सांस्कृतिक नगरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या नावाला काळिमा फासल्या जात आहे.

 एकीकडे शहरात फोफावत जाणार्‍या वेश्‍या व्‍यवसायाला आळा घालण्‍यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाने कंबर कसली आहे; परंतु ‘याच सामाजिक सुरक्षा विभागाचे या भागात जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे’, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. पाश्चात्य देशांमध्‍ये ‘स्‍पा सेंटर’ किंवा ‘मसाज सेंटर’ असतात. गेल्‍या काही वर्षांपासून भारतात याचे प्रस्‍थ वाढत आहे. पुणे शहरात काही ‘मसाज सेंटर’ निवासी संकुलातही थाटले आहेत. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.

विविध प्रस्‍ताव देऊन ग्राहकांना आकर्षित करण्‍यासाठी सामाजिक माध्‍यमांवर वेगवेगळ्‍या प्रकारची विज्ञापने केली जातात. यामध्‍ये एका घंट्याला किती पैसे यांसह वेश्‍या व्‍यवसायाचा प्रस्‍तावही दिलेला असतो.  सामाजिक माध्‍यमे वापरणारी तरुण पिढी या वाममार्गाकडे वळत आहे. त्‍यामुळे ‘आयुर्वेदिक मसाज पार्लर’च्‍या नावाखाली चालणारे देहविक्रीचे व्‍यसन वाढत आहे.

उच्‍चभ्रू सोसायटीत थाटला जात आहे वेश्‍या व्‍यवसाय !

‘स्‍पा आणि मसाज सेंटर’च्‍या नावाखाली चालू असलेल्‍या वेश्‍या व्‍यवसायाची माहिती पोलिसांना समजू नये; म्‍हणून दलालांकडून उच्‍चभ्रू परिसराची निवड केली जात आहे. ‘आयुर्वेदिक मसाज सेंटर’च्‍या नावाने विज्ञापन करून त्‍याला आकर्षक पद्धतीने सिद्ध केले जाते. अनेकदा त्‍याचा अंदाज येथील नागरिकांनाही येत नाही. सोसायटीमधील सदनिका भाड्याने घेऊन ‘स्‍पा’च्‍या नावाखाली वेश्‍या व्‍यवसायाचा धंदा चालवला जात आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close