विशेष

गुन्हेगारी वर्तुळात कट्टा बाळगण्याची ‘क्रेझ’ वाढली.

Spread the love

 

देशीकट्टा बाळगणाऱ्या १०६ आरोपीना अटक

यवतमाळ / अरविंद वानखडे

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढता आलेख पाहता राज्यात यवतमाळ जिल्ह्याचे नांव अग्रस्थानी येऊ पाहत आहे. मागिल काही गुन्हेगारी घटनांवरून अल्पवयीन मुलांच्या हातीसुध्दा देशी कट्ट्यसारखे शस्त्र आढळल्याने पोलिसांनाही विचार करायला लावणारी बाब ठरत आहे. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आता देशी कट्टा बाळगणे हे एक प्रकारचे प्रतिष्ठेचे लक्षण बनले आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला असता पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागातून देशी कट्टा बाळगणाऱ्या १०६ जणांवर कारवाई केली आहे. हे १०६ प्रकाशझोतात आलेले आरोपी असले तरी असे आणखी कित्येक जणांजवळ हे शस्त्र असल्याचे नाकारता येत नाही.
जिल्ह्यात विनापरवाना देशी कट्टा बाळगण्याची ‘क्रेझ’ वाढली असल्याचे अलिकडच्या काळात झालेल्या कारवाईवरून दिसून येते. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी असून कारवाई करत हत्या आणि २० चोरीच्या इराद्याने देशीकट्टा आरोपींना बाळगणाऱ्या १०६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आली आहे आहेत. सर्व आरोपींकडून ४५ देशीकट्टे आणि १७९ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
जिल्ह्यात २०१९ सालापासून अवैध देशीकट्टा बाळगणे व विक्री प्रकरणी ४४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया गेल्या पाच वर्षांत करण्यात आल्या असून या प्रकरणी १०६ आरोपींना अटक देशीकट्टे २५ काडतुसे जप्त
करण्यात आली आहे. जिल्ह्यात अवैध देशीकट्टे बाळगणाऱ्यावर २०१९ मध्ये ११ गुन्हे दाखल
अटक करण्यात तर त्यांच्याकडून १५ देशी कट्टे १२९ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. २०२० साली ४ गुन्हे दाखल असून ८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ देशीकट्टे व ५ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. २०२१ मध्ये १२ गुन्हे दाखल असून ४५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १०

२०२२ मध्ये ६ गुन्हे दाखल असून १२ आरोपीला अटक करून ८ देशीकट्टे १० काडतुस जमा करण्यात आलेली आहेत, तर १ जानेवारी २०२३ ते २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत ११ गुन्हे दाखल करून २१ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ९ देशीकट्टे व १० जिवंत काडतूसे जमा केली आहेत. या सर्व गुन्हेगारी घटना पाहता नविन पिढी गुन्हेगारी क्षेत्राकडे गुरफटली जात असल्याचे चित्र आहे. यावर पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांना विशेष मार्गदर्शनाची गरज.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close