राजकिय

ललित पाटील वरून राजकीय वातावरण तापले ; आरोपप्रत्यारोपाच्या फैरी

Spread the love

पूणे / नवप्रहार मीडिया 

                  ड्रग्स माफिया ललित पाटील याने उपचारादरम्यान ससून रुग्णालयातून  पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन  केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांच्यावर सतत आरोप होत असताना आमदार धंगेकर यांच्या वक्तव्याने आगीत तेलाचे काम केले आहे.

मागील आठवड्यापासून ललित पाटीलचा विषय राज्याच्या राजकारणाचा विषय झाला आहे. ससून रूग्णालयातून पोलिसांना हुलकावून ललित पाटील फरार झाला आहे. यावरून आता रविंद्र धंगेकर यांनी दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला आहे. ललित पाटील ससूनमध्ये उपचारासाठी दाखल असताना तो हॉटेलमध्ये जायचा. त्या हॉटेलमध्ये त्याच्यासाठी महिला कोण पाठवायचं? असा गंभीर सवाल रविंद्र धंगेकर यांनी केलाय.

दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दादा भुसे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यानंतर सुषमा अंधारे यांचे आरोप बिनबुडाचे असून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले आहे. तर नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय ड्रग्जचा कारभार अशक्य आहे. दादा भुसे यांना ड्रग्ज माफियांकडून किती खोके मिळाले ? असा सवालही त्यांनी केलाय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close