मराठी पत्रकार संघाचा सत्कार सोहळा उपक्रम गणेशोत्सव मंडळाकरीता अविस्मरणीय क्षण असून प्रेरणादायी…….
अधिकारी यांनी गणेशोत्सव मंडळच्या अध्यक्षाचा सन्मानपत्र तर प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार सोहळा
मराठी पत्रकार संघाचे आयोजन सर्वाच अधिकाऱ्याची उपस्थिती
चांदूर रेल्वे / अमोल।ठाकरे
चांदूर रेल्वे शहरात सामाजिक संस्कृतीत सलोखा राखत गणपती बाप्पाच्या स्थापना पासून तर विसर्जन पर्यंत 10 दिवस शहरातील युवक एकत्रित येऊन गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात अश्या मंडळाच्या कार्याची दखल घेत चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघाने आनंदराव सभागृहात मंडळाच्या अध्यक्ष,सचिव व कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा आयोजित केला या सत्कार सोहळात उपस्थित पाहुण्यांनी दीप प्रज्वलित करत मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर व गणपती बाप्पाच्या फोटोचे पुजन केले तर मराठी पत्रकार संघातर्फे आमंत्रित सर्वच पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शहरात एकूण आठ गणेशोत्सव मंडळ असून या मध्ये 82 वर्ष म्हणजेच स्वतंत्रपूर्वी पासून असलेले सरदार गणेशोत्सव मंडळ तर सतत 50 वर्ष पूर्ण करून बाप्पाची सेवा करणारे युवक मंडळ असून क्रांती चौकाचा राजा म्हणून क्रांती मंडळाला 34 वर्ष झाली तर सामाजिक,संस्कृती,आरोग्य अश्या विविध उपक्रम राबवित राजे विर संभाजी गणेशोत्सव व राधानगर गणेशोत्सव,सिंध गणेशोत्सव,युवा गणेशोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज गणेशोत्सव मंडळ ह्यांनी लोकमान्य टिळक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणेशोत्सव सण हा भव्यदिव्य स्वरूपाने साजरा करत सतत 10 दिवस परिश्रम घेत विसर्जनाच्या दिवशी शांतता सुव्यवस्थेत जातीय सलोखा राखत पार पाडतात अश्या मंडळाची दखल घेत स्थानिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आनंदराव सभागृहात घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष रविन्द्र जोगी उपविभागीय अधिकारी,उद्घाटन सचिंद्र शिंदे उपविभागीय पोलिस अधिकारी तर प्रमुख पाहुणे म्हणून अरूण तिवारी जिल्हा उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ अमरावती.दैनिक मंगल प्रहरचे संपादक सुधीर गणविर,नंदू यादव,तहसिलदार पूजा माटोडे,ठाणेदार सतिश पाटील,पंचायत समितीचे बिडीओ संजय खारकर, नप मुख्याधिकारी डॉ विकास खंडारे,माजी अध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी,विशेष निमंत्रण सदस्य मराठी पत्रकार संघ अँड राजू अंबापुरे यांच्या हस्ते उपस्थित मंगळाच्या अध्यक्ष,सचिव,सदस्य यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर गावांतील विविध सामाजिक क्षेत्रात मदतीचा हात पुढे करणारे सामाजिक कार्यकर्ते पप्पू भालेराव,माजी नगरसेविका स्वाती मेटे,माजी अध्यक्ष निलेश सुर्यवंशी,पंचायत समिती सदस्य अमोल होले,बाजार समितीचे संचालक अतुल चांडक,माजी संचालक बंडू मुंदडा,मैत्री ग्रुपचे हर्षल वाघ,सन्नी जोशी,शासकीय कंत्राटदार गजानन खंडार,समाजसेवक राजिक पठाण,स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी यांच्या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोष्पाअध्यक्ष सुधीर तायडे,प्रास्ताविक सचिव बंडू आठवले तर आभार प्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष गुड्डू शर्मा यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मंगेश बोबडे,शहर अध्यक्ष राजेश सराफी,शहर उपाध्यक्ष अभिजित तिवारी,शहर सचिव अमोल ठाकरे,प्रसिद्ध प्रमुख हरीश ढोबळे,प्रमोद इंगळे,दिनेश जगताप,मनोज गवई,सुभाष कोटेचा यांनी अर्थ परीश्रम घेतले यावेळी माजी नगरसेवक बच्चू वानरे,सचिन जयस्वाल,स्वप्निल मानकर,बंटी माकोडे,प्रदिप मेश्राम,मयुर कोरडे,वंश बाबर,नंदा वाधवानी,गोपाल अविनाशे,सनी गांवडे,अर्पणा जगताप,डॉ सुषमा खंडार व शहरातील इतर प्रतिष्ठात नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
# गणेशोत्सव मंडळाकरीता अविस्मरणीय क्षण असून
प्रेरणादायी उपक्रम आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित शहरातील सर्वच अधिकार्यांनी मंचावरून आपले विचार व्यक्त करत सांगितले की मराठी पत्रकार संघाचा हा उपक्रम गावातील गणेशोत्सव मंडळासाठी अविस्मरणीय क्षण असुन त्यांनी इतक्या वर्षापासून चालविलेल्या सामाजिक,संस्कृतीत,अरोग्य,रक्तदानशिबिर,पर्यावरण,देशभक्ती,पाणी वाचवा,मुलगी बचाव असे विविध देखावे सादर करत केलेल्या कार्याची ही पावती असून आम्ही पुढील वर्षी हा उपक्रम मराठी पत्रकार संघा सोबत संयुक्त पणे चांदूर रेल्वे शहरात राबवू अशी ग्वाही देतो म्हणून हा क्षण आज उपस्थित सर्वांसाठी अविस्मरणीय असून
प्रेरणादायी आहे.