एका तरुणाने ‘ डर के आगे जीत है ‘ हे केले सिद्ध

भीती आणि आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असे म्हटल्या जाते. पण मनातून भीती घालवली तर कुठलीही समस्या फार मोठी वाटत नाही. एक शीतपेय विकणारी कंपनी आपल्या जाहिरातीत ‘ डर के आगे जीत है ‘ असे म्हणते. आणि खरच एका तरुणाने ” डर के आगे जीत है ” हे सिध्द करून दाखवले आहे. चला तर जाणून घेऊ या नेमका प्रकार काय ?
बिबट्याबद्दल जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हा कुणालाच सोडत नाही.
दरम्यान असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुण चक्क बिबट्याला एकटा भिडलाय. बिबट्याची अशी अवस्था तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. पहिल्यांदाच बिबट्याला पाहून त्याची दया येईल. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं.
बिबट्या हा एक खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीतही सहज शिकार करू शकतो. वेळ पडली तर रात्रीच्या अंधारात तो वाघ-सिंहांशी सुद्धा टक्कर घेऊ शकतो. असा हा खतरनाक प्राणी यावेळी एका तरुणाशी भिडलाय. शेतकरी शेतात राहताना त्याला अनेकदा जंगली प्राण्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा जंगली प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांवर जीवघेणे हल्ले होतात. यात त्यांचा बळीही जातो. मात्र, एक शेतकरी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी भिडल्याचं पाहायला मिळालं.
तरुणाची ट्रिक पाहून व्हाल अवाक्
एका तरुणावर शेतात असतानाच झुडपात दडून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि क्षणातच युवकाला जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या युवकाने मात्र हार मानली नाही. त्याने अंगावर आलेल्या बिबट्याशी झुंज दिली आणि ताकदनिशी त्याला दूरवर फेकले. त्यानंतर भेदरलेला बिबट्याही जंगलाच्यादिशेने पसार झाला. बिबट्याने तरुणावर पाठीमागून झडप मारली.बिबट्याने त्याच्या मानेवर पंजे मारले. त्यानंतर बिबट्या आणि तरुण समोरासमोर आले. तरुणाने अंगावर आलेल्या बिबट्याला पूर्ण ताकदनिशी प्रतिकार केला. तरुणानं हातात बिबट्या येताच त्याला उचलून दूरवर फेकले. तेव्हा मात्र बिबट्या भेदरला. त्यानंतर आरडाओरड सुरु करताच बिबट्या पसार झाला.
हा व्हिडीओ motivational.fire नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला आतापर्यंत १४९,६४२ व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आहे.’ असं एका युजरने लिहिले आहेत. “मला आज कळलं की बिबट्याला जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी का म्हटलं जातं. या व्हिडीओतील तरुणाची अप्रतिम शक्ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.