गडचिरोलीचे कराटेपटू ब्लॅक बेल्ट परीक्षा उतीर्ण
गडचिरोली, ता.५ :
तिलोत्तमा हाजरा
नागपूर येथील मॉन्ट फोर्ट स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत गडचिरोलीच्या कराटेपटूंनी उत्तीर्ण होत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
ही परीक्षा घेण्याकरिता साऊथ आफ्रिकेवरून साऊथ आफ्रिका कराटे फेडरेशनचे अध्यक्ष हांशी सोनी पिल्ले तसेच कॉमनवेल कराटे फेडरेशनचे अध्यक्ष व वर्ड कराटेचे तांत्रिक अधिकारी आले होते.भारतातून अनेक विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट परीक्षा सहभाग घेतला. या परीक्षेत गडचिरोलीहून प्रिशा काबरा, स्वरा नेरकर, दक्ष टिंगुसले, श्रावणी कोहळे यांनी 1st डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षा पास केली आहे. तसेच मोहित मेश्राम व यश नेदुरवर यांनी 2nd डिग्री परीक्षा पास केली आहे . आरोही चव्हाण व गौरी सालोटकर, शुभम कोंडे व फिरोज आली सय्यद, सार्थक गेडाम यांनी 3rd डिग्री परीक्षा पास केली. त्याच प्रमाणे मिलिंद गेडाम व महेंद्र वटी व महेश मेश्राम यांनी 5th डिग्री परीक्षा पास केली आहे. सेंसाई योगेश चव्हाण यांना 6th डिग्री परीक्षा पास करून आंतरराष्ट्रीय पातळीवर शिहानही पदवी प्राप्त केली आहे.आपल्या यशाचे श्रेय गडचिरोली जिल्हा कराटे संघटनाचे अध्यक्ष प्रशांत वाघरे व उपाध्यक्ष रूपराज वाकोडे व समस्त गडचिरोली जिल्ह्यातील जनतेस दिले.