उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे सरवणकर यांच्या बाबतीत सूचक विधान

मुंबई / विशेष प्रतिनिधी
माहीम मतदार संघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. महायुतीने या मतदार संघातून उमेदवार न देण्याचे ठरवले होते. पण शिवसेना शिंदे गटाचे आ. सदा सरवणकर यांनी अखेरच्या दिवशी (दि. 29 ऑक्टोबर ) मुदत संपण्याच्या काही वेळेपूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण आता फडणवीस यांनीं त्यांनी अर्ज जरी भरला असेल तरी ते निवडणूक लढवतीलच असे नाही. असे सूचक विधान केल्याने सरवणकर 4 नोव्हेंबर पर्यंत आपली उमेदवारी मागे घेऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही.
नेमका गोंधळ काय?
महायुतीचे वरिष्ठ नेते अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी साकारात्मक भूमिकेत होते तरीही मागील अनेक वर्षांपासून महीममधून निवडून येणारे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवणारच आणि यावर आपण ठाम असल्याचं वरिष्ठांना कळवलं. अखेरच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर उमेदवारी अर्ज भरणार की नाही याबद्दल सस्पेन्स कायम होता. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. असं असतानाच आता दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी सरवणकर लढतीलच हे निश्चित नसल्याचे संकेत दिले आहेत.
अमित ठाकरेंबद्दल महायुतीची भूमिका काय? फडणवीस म्हणाले…
मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा केली. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांची देखील मान्यता होती. परंतु काही अडचणी आल्या. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे म्हणणं होत की तसं झालं की मतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जातील,” असं सांगितलं
फडणवीसांचं ते सूचक विधान काय?
तसेच सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला असला तरी ते निवडणूक लढवतील असं निश्चित नसल्याचे सूचक संकेत फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले. सदा सरवणकरांसंदर्भात बोलताना, “सदा सरवणकर माघार घेणार का हे आम्ही ठरवू बैठकीत,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत होणाऱ्या बैठकी आणि चर्चांदरम्यान समजोता झाल्यास सरवणकर अर्ज मागे घेणार का हे अजून गुलदस्त्याच आहे.
दरम्यान, सणवकरकांनी आपल्याला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला असल्याने आपण अर्ज भरला असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सरवणकरांनी आपल्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता असं म्हटलं आहे.