शैक्षणिक

शिक्षण परिषद व सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न

Spread the love

 

भंडारा/  प्रतिनिधी

दिनांक 30/09/2023 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी (पुर्न) केंद्र ठाणा येथे केंद्र स्तरीय शिक्षण परिषद केंद्रप्रमुख वंसतजी साठवणे सर याच्या उपस्थित पार पडली. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून श्दिनेश गिदमारे, भागवत खोब्रागडे, वंसत काटेखाये , रामप्रसाद मस्के , सौ.अनिता रहांगडाले, कु.मोना सार्वे यांनी कार्य केलेत.
नियमीत वयोमानानुसार सेवानिवृत्ती होऊ घातलेले सत्कारमूर्ती ज्ञानेश्वर मारोतराव बागडे सहा. शिक्षक व याच शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. कुसुमलता दिलीप वाकडे मॅडम यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रम देविदास ठवकर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख उपस्थितीत सौ.शिल्पाताई निखाडे मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स.भंडारा, श्री.प्रविणजी लांडगे अध्यक्ष शा.व्य.स.पिपरी, अरुणजी चन्ने उपसरपंच , नाशिकजी चवरे ग्रामपंचायत सदस्य पिपरी यांचे उपस्थित पार पडला.
ईश्वर नाकाडे सर मुख्याध्यापक पिपरी यांनी प्रास्ताविक भाषणात आ. सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा परिचय करुन दिला. केंद्रप्रमुख आ. वसंतजी साठवणे सरांनी वाकडे मॅडम व बागडे सरांच्या शैक्षणिक कार्यतील योगदान बद्दल भरभरून बोललेत. निखाडे मॅडम नी सुध्दा कौतुकाची थाप दिली. नाशिकजी चवरे यांनी वाकडे मॅडम च्या साहित्य लेखनाबद्दल व बागडे सरांच्या हस्ताक्षराचे सुंदर गुण सांगितलेत. सौ. वंसुधरा बन्सोड व नेहा वाकडे यांनी सत्कारमूर्ती यांचे उल्लेखनीय कार्य पुढे मांडलेत.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बागडे सर व वाकडे मॅडम यांचा सहपत्निक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दोन्ही सत्कारमूर्तीनी आपल्या आजपर्यंतच्या सेवेविषयी आलेल्या अनुभवांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वानी सौ. कुसुमलता वाकडे मॅडम व श्री. ज्ञानेश्वर बागडे सर यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्यात व जेवणाचा आस्वाद घेतला.
या सेवानिवृत्ती कार्यक्रमास ठाणा केंद्रातील सर्व शिक्षकवृंद , ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगणवाडी शिक्षिका श्रीमती उषा गाढवे, सौ. सुरेखा लांबट आशावर्कर सौ. कुंदा चवरे, सौ. सोनिया चवरे, अनिलजी लांडगे , स्वयंपाकीण ताई गिरजा शेंडे, पायल चवरे पिपरी गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांथी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भुरे सर तर आभार कु.मोना सार्वे मॅडम यांनी मानलेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close