विशेष

त्याचा त्या जुगाडाने आनंद महिंद्रा देखिल झाले अचंभित

Spread the love

                          भारतात जुगाड टेक्नॉलॉजी हा फार प्रचलित शब्द झाला आहे. देशातील लोक विभिन्न प्रयोग करून अशी काही वस्तू बनवतात की त्याची चर्चा जगभर होते. आणि सोशल मीडियावर त्यावर कॉमेंट्स देखील होतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते पाहून स्वतः आनंद महिंद्राना देखील आश्चर्य झाले आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका माणसाने ट्रॅक्टरची सीट आणि स्टेअरिंगमध्ये अनेक बदल केले आहेत.या माणसाने ड्रायव्हर सीट आणि स्टेअरिंग खूप उंच करुन ठेवली आहे. तो आरामात हा ट्रॅक्टर चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.आनंद महिंद्रा हा व्हिडिओ बघून आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हिडिओ शेअर करत महिंद्रांनी प्रश्न विचारला आहे. त्यांनी लिहिले आहे की,’हे जरा मजेशीर वाटत आहे. पण मला प्रश्न पडला आहे की हे असे का केलेले असावे?’ एका माणसाने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले आहे की,बहुतेक त्याने महिंद्रा कंपनीची ‘महिंद्रा राईज’ ही टॅगलाइन फारच मनावर घेतलेली असावी. त्यामुळे त्याने तसे केलेले असावे. धर्मेंद्र कुमार यांनी लिहिले आहे की, ‘महिंद्रा ट्रॅक्टर घेतल्यानंतर आकाशाला गवसणी घालणारा शेतकरी ‘.

एकाने लिहिले आहे की, असे वाटत आहे की, या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला लांबपर्यंतचे ट्रॅफिक बघायची इच्छा आहे. दुसऱ्या एका माणसाने लिहिले आहे की,’ हा पहिला असा माणूस आहे ज्याला जमिनीशी नाळ जोडून राहायचे नाहीये’. एकाने लिहिले आहे की, ‘कदाचित याच्या मोबाईलला सिग्नल मिळत नसेल. त्यामुळे त्याने असे केले असावे’. दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘त्याला कदाचित माहिती असावे कि काहीतरी भन्नाट केल्याशिवाय आनंद महिंद्रांचे लक्ष त्याच्याकडे जाणार नाही’.आनंद महिंद्रांची ही पोस्ट लाखो लोकांनी बघितली आहे.अनेकांना या ट्रॅक्टरच्या सीटची आणि स्टेअरिंगची उंची वाढवण्यामागचे कारण जाणून घ्यायचे आहे. काहींना ट्रॅक्टरमध्ये केलेला हा बदल आवडलेला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close