क्राइम

पोलिसच निघाला खून  प्रकरणातील आरोपी 

Spread the love
 

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया

 
जवळपास दोन वर्षांपूर्वी सन २०२१ मध्ये एका महिला कॉन्स्टेबलची हत्या झाली होती. पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. पण आरोपी पोलिसांना गवसत नव्हता. या प्रकरणातील आयओ (चौकशी अधिकारी ) ला हिंट मिळाली की मृतक महिला कॉन्स्टेबल सोबत पोलीस विभागातील एका हेड कॉन्स्टेबल चे संबंध होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. मृत महिला कॉन्स्टेबल ही त्याच्यावर लग्नासाठी दबाब टाकत असल्याने  आणि तो विवाहित असल्याने त्याने तिची हत्या केल्याचे कबुल केले आहे. 
 
या कारणाने केली हत्यामृत  महिला कॉन्स्टेबल ही आरोपी पोलिसावर लग्नासाठी दबाब टाकत होती. पण हा विवाहित असल्याने वेळ मारून नेट होता. शेवटी ही गोष्ट डोक्याबाहेर गेल्याने तिच्या पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी त्याने तिच्या खुनाचा कट रचला. 
हत्येनंतर मृतदेह नाल्यात लपवून ठेवला

अशी केली हत्या – 
आरोपीने महिला कॉन्स्टेबलच्या हत्येचा कट रचला. यानंतर आरोपीने २०२१ मध्ये महिला कॉन्स्टेबलची हत्या केली. खून केल्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात लपवून ठेवला होता. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल केला.
२ वर्षानंतर महिला कॉन्स्टेबलचा सांगाडा सापडला

महिला कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हेड कॉन्स्टेबलला अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. आरोपींच्या सांगण्यावरून पोलिसांनी २ वर्षानंतर मृत महिला कॉन्स्टेबलचा सांगाडाही जप्त केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close