52 खेड्यांना मिळेल आरोग्य सुविधा
चोहोटा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच उभारू
आमदार रणधीर सावरकर यांचे आश्वासन
चोहोटा बाजार येथे आरोग्य सुविधेसाठी लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीसाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना नागरिकांना दिले.
अकोट तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मुख्य मार्गावर असलेले अतिशय महत्वाचे ठीकान मनून चोहोटा बाजारची या गावची ओळख आहे.
परिसरातील 52 खेड्यागावांना दैंनदिन सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात या गावची अधिक मदत होते.
परंतु परिसरातील 52 खेड्यागावांमधील नागरिकांना चांगली शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना आजपर्यंत झाली नाही.
परिसरातील लोकसंख्येच्या तुलनेत
याठिकाणी ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
याठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा हा परीसरातील हजारो गोरगरीब कुटुंबाला होईल.
करिता याठिकाणी ग्रामीण रुग्णालय किवा प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याची मागणी शेषराव वसू , विनोद मंगळे, मधुकर पाटकर , संतोष शिवरकार , माधवराव बकाल, दादाराव पेटे , मंगेश ताडे , मनिष मोडक , विवेक भरणे , दत्तू गावंडे , सुभाष मुकुंदे , पांडुरंग पाटकर, दिलीप सुलताने , सुमेध बागलकर , रुपेश पेटे, पवन वर्मा , न्यानेस्वर आढे , मंगेश घुले , धनंजय बुंदे , निलेश खोटरे , सुधाकर खोटरे , अनिल इंगळे , संदीप अरबट , सह परिसरातील नागरिकांनी आमदार सावरकर यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत आरोग्य केंद्र लवकरात लवकर मंजूर व्हावे यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून ते मंजूर करून आणू असे आश्वासन यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आहे.